पुणे – “हर हर महादेव’ (har har mahadev) या चित्रपटावरून झालेल्या वादानंतर राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांना अटक करण्यात आली होती. ठाण्याच्या विवियाना मॉलमध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून (MNS) या चित्रपटाचा (har har mahadev) मोफत शो ठेवण्यात आला होता. मात्र, त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड (jitendra awhad) आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी ठाण्याच्या विवियाना मॉलमध्ये जाऊन हर हर महादेव या चित्रपटाचा शो बंद पाडला होता. मात्र, हा शो बंद पाडताना जितेंद्र आव्हाड यांनी एका प्रेक्षकाला मारहाण केली, असा आरोप त्यांच्यावर करण्यात आला होता.

मात्र, आव्हाडांवर (jitendra awhad) झालेल्या या कारवाईनंतर अभिनेत्री केतकी चितळेने (ketaki chitale) सुद्धा आपली प्रतिक्रिया दिली होती. केतकी चितळेच्या वतीने वर्तक नगर पोलिस ठाण्याला एक नोटीस पाठवण्यात आली होती.

आव्हाड यांच्यावर लावण्यात आलेली कलमे पुरेशी नसून अजून कलमे त्यात वाढवण्यात यावीत अशी मागणी, केतकी चितळे (ketaki chitale) हिने आपल्या नोटीसीमधून केली. त्यांच्यावर जी कलमं लावण्यात आली आहेत ती लगेच जामीन मिळतील अशी आहेत.

परंतु, या कलमांध्ये विनयभंगाचं कलम लावण्यात आलेलं नाही. चित्रपटगृहात ज्या प्रेक्षकाला मारहाण झाली त्यांच्या पत्नीसोबत जितेंद्र आव्हाडांच्या कार्यकर्त्यांनी गैरवर्तन केलं. त्यामुळे आव्हाडांविरोधात विनयभंगाचं कलम लावावं.

शिवाय हा हल्ला कट रचून करण्यात आाय. परंतु, पोलिसांनी आव्हाड यांच्याविरोधात विनयभंगाचं कलम लावलं नाही. त्यामुळे त्यांच्यावरील कलमांमध्ये वाढ करण्यात यावी, अशी मागणी केतकीने केली होती.

दरम्यान, केतकीच्या (ketaki chitale) या विधानाचा ठाकरे गटाच्या नेत्या नीलम गोऱ्हे (neelam gorhe) यांनी समाचार घेतला आहे. केतकी चितळेच्या रुपाने महाराष्ट्राला मिनी कंगना राणावत (kangana ranaut) जन्माला येत आहे, अशा शब्दात नीलम गोऱ्हे (neelam gorhe) यांनी टीका केली.

नीलम गोऱ्हे मीडियाशी संवाद साधत होत्या. जितेंद्र आव्हाड यांनी राजीनाम्याचा निर्णय घेऊ नये. नक्की विनयभंग झाला आहे का ते तपासाव लागेल, असं सांगतानाच केतकी चितळे यांना मी मदत केली होती.

पण तिची काही विधाने पाहता केतकी चितळे हिच्या रूपाने महाराष्ट्रात मिनी कंगना राणावत (kangana ranaut) जन्माला येत आहे, अशी टीका नीलम गोऱ्हे यांनी सांगितलं.