पुणे – दिवाळीचा उत्सव हा (Diwali) फराळ व फटाक्यांची आतीषबाजी, आकाशकंदील आणि पणत्यांच्या प्रकाशाने उजळून निघणारा आहे. गेल्या दोन वर्षांपासून करोना (Corona) महामारीच्या साथीमुळे सर्वांनाच दिवाळीचा सण निर्बंधांमध्ये साजरा करावाला लागला होता. मात्र, यंदाच्या वर्षी करोनाचा (Corona) आलेख पूर्ण पणे खाली आला असून, मोठ्या आनंदात दिवाळीचा (Diwali) सण साजरा नागरिकांनी साजरा केला आहे.

दिवाळीच्या (Diwali) सुट्टीत अनेक चाकरमानी आपल्या घरी होते, मात्र नुकतंच सुटीतील अखेरच्या रविवारी म्हणजेच, काल पुण्यातील सिंहगड (sinhagad-rajgad) किल्ला पर्यटकांनी ‘हाऊसफुल्ल’ झाला होता.

तर, दुसरीकडे दुर्गम राजगड (sinhagad-rajgad) व तोरणा गडासह पानशेत धरण परिसरही पर्यटकांनी गजबजून गेला होता. वेगाने वाहणार्‍या कडाक्याच्या थंडगार वार्‍याची पर्वा न करता लहान मुले, महिला, तरुणाईने गडकोटांवर, धरण परिसरात दिवाळीच्या सुटीचा आनंद साजरा केला.

काल रविवारी सकाळपासूनच सिंहगडावर (sinhagad-rajgad) पुणे, मुंबई ठाणे, राज्यासह देशभरातील पर्यटकांची वर्दळ सुरू होती. त्यामुळे मोठ्या ग्रेडी देखील पाहायला मिळाली होती.

सकाळी अकरानंतर पर्यटकांची गर्दी वाढली. वनविभागाने गडाच्या पायथ्याच्या डोणजे, गोळेवाडी व अवसरवाडी टोलनाक्यापासून घाट रस्ता, गडावरील टोलनाक्यावर वाहतुकीचे नियोजन केले होते.

तरीही एकाच वेळी दोन्ही मार्गांनी वाहनांची वाहतूक वाढल्याने काही काळ घाट रस्त्यावर वाहतूक कोंडी झाली. तसेच, यावेळी गडावरील वाहनतळ फुल्ल झाल्याने थेट घाट रस्त्यावर वाहनांच्या रांगा लागल्या होत्या.

राजगड (sinhagad-rajgad) तसेच तोरणा गडावर सकाळपासून पर्यटकांनी वर्दळ सुरू होती. राजगडावर दिवसभरात दोन हजारांहून अधिक पर्यटकांनी हजेरी लावली. त्यामुळे मोठ्या संख्येनं वाहतूक कोंडी झाली होती. दरम्यान, सुटीच्या दिवशी वाहतूक नियोजन करणे आवश्यक असल्याचं यावेळी दिसून आलं.