पुणे – पक्षाला पुन्हा उभारी देण्यासाठी काँग्रेसचे (Congress) नेते आणि खासदार राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी भारत जोडो यात्रा काढली आहे. कन्याकुमारी ते श्रीनगर असा या यात्रेचा मार्गक्रमण असून काल या यात्रेचा ३१वा दिवस होता. काल राहुल गांधी यांनी कर्नाटकातील तुरुवेक्रे येथे माध्यमांशी संवाद संवाद साधला. यावेळी त्यांनी आरएसएस (RSS) आणि वीर सावरकर (Veer Sawarkar) यांच्यावर निशाना साधला.

‘मला वाटते की आरएसएस इंग्रजांना मदत करत होती आणि सावरकरांना इंग्रजांकडून मानधन मिळत होते, अशी टीका राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी केली होती. यावरुन आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत.

अश्यातच, आता पुण्यात (Pune News) सावरकरांच्या (Vinayak Damodar Savarkar) पुतळ्यासमोर माफीवीरचे फ्लेक्स लावण्यात आले होते. राहुल गांधी यांनी सावरकरांबद्दल (Veer Sawarkar) पुरावे सादर केले होते.

त्यानंतर काँग्रेस (Pune Congress) कार्यकर्ते आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालंय. काल सकाळी पुण्यातील सारसबाग चौकात असलेल्या विनायक सावरकर यांच्या पुतळ्याच्या समोर माफीवीर आणि राहुल गांधी यांनी दिलेल्या पुराव्याचे फ्लेक्स लावण्यात आले.

महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसच्या वतीने हे फ्लेक्स लावण्यात आले होते. मध्यरात्री दीड ते दोन वाजण्याच्या सुमारास हे बॅनर लावण्यात आलेले. मात्र, आता हे फ्लेक्स हटवण्यात आले आहेत.

राहुल गांधी हे भारत जोडो यात्रेच्या निमित्ताने सध्या महाराष्ट्रात आहेत. नांदेड हिंगोलीनंतर आता आज राहुल गांधी यांची शेगावमध्ये सभा होणार आहे.

शेगावमधील सभेतही राहुल गांधी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या माफीच्या मुद्द्यावरुन आता सुरु असलेल्या राजकीय घडामोडींवर भाष्य करण्याची शक्यता आहे. त्यामुळे या सभेकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय.