पुणे – पुणे (Pune News) महानगर परिवहन महामंडळ लिमिटेड (PMPML) कडून बाजीराव रोड, शिवाजी रस्त्यावरील सात मार्ग 4 नोव्हेंबर पासून पूर्ववत (PMPML) सुरू होणार असल्याची माहिती पीएमपीएमएल (PMPML) ने काल दिली आहे. विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक व प्रवासी नागरिक यांची होणारी गैरसोय लक्षात घेता पुणे महानगर परिवहन महामंडळाने हा निर्णय घेतला आहे.

पुणे शहराच्या मध्यवर्ती भागात असणाऱ्या बाजीराव रोड/ शिवाजी रोडवरील वाहतूक कोंडी कमी करण्याच्या दृष्टीने पीएमपीएमएल कडून 28 जुलै 2022 पासून बाजीराव रोड/ शिवाजी रोड मार्गे संचलनात असलेल्या मार्गांमध्ये बदल करण्यात आला होता.

बाजीराव रोडने जाणाऱ्या बसेस जाताना दांडेकर पूल, शास्त्री रोड, फर्ग्युसन कॉलेज रोड मार्गे व शिवाजी रोडने येणाऱ्या बसेस येताना जंगली महाराज रोडने डेक्कन, टिळक रोड मार्गे असा बदल प्रायोगिक तत्वावर करण्यात आला होता.

त्यामुळे विशेषतः विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक व प्रवासी नागरिक यांची मोठ्या प्रमाणात गैरसोय होत होती. ही गैरसोय लक्षात घेता पुणे महानगर परिवहन महामंडळाकडून खालील तक्त्यात नमुद केलेले सात मार्ग शुक्रवार 4 नोव्हेंबर 2022 पासून पूर्ववत म्हणजेच जाताना बाजीराव रोड मार्गे व येताना शिवाजी रोड मार्गे संचलनात सुरू राहणार आहेत.

मार्ग क्र.: पासून पर्यंत: बस संख्या: खेपांची संख्या

2अ : कात्रज ते शिवाजीनगर : 2 : 20

20 : सहकार नगर ते संगमवाडी : 1 : 16

21 : स्वारगेट ते सांगवी : 8 : 104

30 : मार्केट यार्ड ते घोटावडे फाटा : 7 : 56

37 : नता वाडी ते सहकार नगर : 2 : 40

68: अप्पर डेपो ते सुतारदारा : 1 : 8

354 : मार्केट यार्ड ते पिंपरी गाव : 10 : 100

एकूण: 31 : 344