पुणे – दिवाळीपूर्वी संपूर्ण महाराष्ट्राच्या राजकारणाचा केंद्रबिंदू ठरलेल्या अंधेरी पूर्व विधानसभा (andheri election) मतदारसंघातील पोटनिवडणुकीसाठी गुरुवारी मतदान पार पडले. मतदारांनी दाखवलेल्या निरुउत्साहामुळे या पोटनिवडणुकीत अवघे ३१.७४ टक्के इतके मतदान झाले. निवडणूक आयोगाने दिलेल्या माहितीनुसार, अंधेरी पूर्व मतदारसंघात एकूण २,७१,००० मतदार आहेत. मात्र, यापैकी फक्त ३१.७४ टक्के म्हणजे ८५,६९८ नागरिकांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावला आहे.

मतदानाच्या इतक्या कमी टक्केवारीमुळे निकालाच्या दिवशी नेमके कसे चित्र पाहायला मिळणार, याविषयीचा संभ्रम आणखीनच वाढला होता. मात्र, अखेर अंधेरी पोटनिवडणुकीत विजय मिळवल्यानंतर शिवसेनेने जल्लोष केला असल्याचं आपण पाहिलं.

पुण्यात देखील या विजयाचा आनंद साजरा करण्यात आला आहे. मात्र, पुण्यातील (pune) हा उत्साह जरा वेगळ्या प्रकारे साजरा करण्यात आला असल्याचं दिसून आलं आहे.

अंधेरी पोटनिवडणुकीत (andheri election) NOTA ला दहा हजारांच्या वर मते मिळाली म्हणून पुण्यात चक्क फटाके फोडून पेढे वाटपाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.

पुण्यातील कोथरूड (Pune news) डेपो भागात असणारे सामाजिक कार्यकर्ते सचिन धनकुडे यांनी नोटाला सर्वाधिक मते मिळाली म्हणून लोकशाहीचा विजय आहे.

असं म्हणत कोथरूड येथे मोठा बॅनर उभारला आणि यावर नोटाला सर्वाधिक दुसऱ्या क्रमांकाची मते मिळाली म्हणून मतदारांचेही आभार मानले. इतकंच काय तर धनकुडे यांनी कोथरूड येथील चौकात बॅनर भोवती रांगोळी काढत दिवे देखील लावले होते.

तसेच येणाऱ्या जाणाऱ्या नागरिकांना पेढे वाटप करण्यात आले. त्याचबरोबर फटाक्यांची माळ वाजवून आनंदोत्सव साजरा केला.

मुंबईत अंधेरी पोटनिवडणुकीत विजय मिळवल्यानंतर शिवसेनेने जल्लोष केला मात्र नोटा लाही दहा हजारांच्या वर मत मिळाल्यानंतर पुण्यातही जल्लोष झाला ही मात्र नवलाची गोष्ट आहे.