पुणे – गेल्या काही महिन्यांपासून महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी उलथापालथ सुरू असल्याचे पाहायला मिळत आहे. रोज एक नवीन राजकीय मुद्दा राज्यात नव्याने पाहायला मिळत आहे. एकनाथ शिंदे (Eknath Shide) यांच्या बंडानंतर शिवसेनेत (Shivsena) अभूतपूर्व फूट पडली आहे. उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी आपल्या मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देखील दिला असून, एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली आहे. तर दुसरीकडे देवेंद्र फडणवीस (devendra fadnavis) यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली आहे. सध्या राज्यात शिंदे सरकार प्रस्तापित झाले आहे.

दरम्यान, ही उलथापालथ झाल्यानंतर आता शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे आता शिवसेनेला (shivsena) वाचवण्याच्या प्रयत्नात आहेत. तर दुसरीकडे एकनाथ शिंदे गट शक्तिप्रदर्शन करून राज्यात आपली पकड मजबूत करताना दिसून येत आहे.

होय.. सध्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्या गटाचा विस्तार दिवसेंदिवस वाढतो आहे. मुंबईत आता 30 शाखा उघडण्यात आल्या आहेत. तर मुंबई महापालिका निवडणुकीआधी हा आवडा 150 वर नेण्याचा शिंदेगटाचा मानस आहे.

दरम्यान, पुणे शहरात देखील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्या गटाची शाखा उघडणार आहे. त्यामुळे आता मुंबई प्रमाणे पुण्यात देखील शिंदे गटाची हवा पाहायला मिळणार आहे.

त्यामुळे पुणे शहरातील राजकीय पक्षांच्या कार्यालयात आणखी एक नवी भर पडते आहे. बाळासाहेबांची शिवसेना या निवडणूक आयोगाने नाव दिलेल्या पक्षाचे नवे प्रशस्त कार्यालय सारसबाग रस्त्यावर तयार होत आहे.

बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीदिनी 23 जानेवारीला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते कार्यालयाचे उद्घाटन करण्याचा पदाधिकाऱ्यांचा विचार आहे. माजी नगरसेवक व या पक्षाचे शहरप्रमुख नाना भानगिरे यांनी यासाठी पुढाकार घेतला आहे.

सारसबाग रस्त्यावरील पाटणकर जागेवर हे दोन मजली कार्यालय असेल. तिथे सध्या फर्निचरचे काम सुरू आहे. भानगिरे यांनी सांगितले की पक्षाच्या कार्यालयीन कामकाजासाठी अशा जागेची आवश्यकता होती. त्यामुळे शहराच्या मध्यभागात कार्यालय सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे.

राजकीय पक्षाचे कार्यालय असते तसेच हेही कार्यालय असेल. पत्रकार परिषदा तसेच वेगवेगळी दालने, कर्मचाऱ्यांसाठी स्वतंत्र कक्ष अशी त्याची रचना असेल. फक्त शहरासाठी नाही तर संपूर्ण जिल्ह्यासाठी हे कार्यालय असेल. अशी माहिती भानगिरे यांनी दिली.