पुणे – पुणे-नगर-औरंगाबाद (संभाजीनगर) असा नवा एक्सप्रेसवे (Pune Aurangabad Expressway) तयार होणार आहे. दळणवळण अतिशय सुखकर व्हावे ग्रामीण भाग हा शहराला जोडला जावा तसेच शहरातील रस्ते हे महानगर क्षेत्राला जोडले जावेत व एक मोठे जाळे रस्त्याचे (Expressway) तयार व्हावे या उद्देशाने केंद्र व राज्य सरकारच्या माध्यमातून अनेक प्रकल्प सुरू झाले आहेत. अश्यातच हा देखील एक नवा प्रकल्प आता सुरु होणार आहे. त्यामुळे पुणे-नगर-औरंगाबाद असा प्रवास करणाऱ्या नागरिकांचा मोठा ताण वाचणार आहे.

पुणे-नगर-औरंगाबाद 260 किलोमीटरचा हा नवा एक्सप्रेस राहणार असून, नगर जिल्ह्यातील (Ahmednagar) नेवासे, नगर, पाथर्डी या तीन तालुक्यांचा समावेश राहील.

नगर -औरंगाबाद या सध्याच्या रस्त्यापासून दहा ते पंधरा किलोमीटर अंतरावरुन हा नवा एक्सप्रेसवे (Expressway) जाणार आहे. हा नवा एक्सप्रेसवे नगर जिल्ह्यातील नगर, नेवासे व पाथर्डी या तालुक्यांतून 124 किलोमीटर जाणार आहे.

सध्या हा प्रकल्प सुरू झाले आहेत. नगर जिह्यामध्येही तीन राष्ट्रीय महामार्गांचे काम सुरू आहे. त्यातच आता नव्याने नगर-पुणे-संभाजीनगर असा नवा महामार्ग तयार होणार आहे. त्यामुळे आता नगर-पुणे अंतर अवघ्या 70 ते 75 मिनिटांमध्ये पार करता येणार आहे.

पुणे जिल्ह्यातील खेड शिवापूर येथून या एक्सप्रेसवेला सुरुवात होणार आहे. या एक्सप्रेसवेसाठी पुणे जिल्ह्यातील भूसंपादनासाठी भूसंपादन अधिकाऱ्यांची नियुक्ती झाली आहे. लोकप्रतिनिधींची बैठक देखील झाली आहे.

दरम्यान, विष्यात नगरकरांचा पुण्याचा प्रवास आणखी वेगात होणार असून, प्रस्तावित संभाजीनगर-नगर-पुणे एक्स्प्रेस वेमुळे नगरकर अवघ्या सव्वा तासांत पुण्यात पोहोचणार आहेत.

100 मीटर रुंदीचा हा एक्स्प्रेस-वे राहणार आहे. नगर जिह्यात त्यासाठी प्राथमिक अंदाजानुसार 1300 हेक्टर क्षेत्र भूसंपादित होणार आहे. संभाजीनगर-नगर-पुणे एक्स्प्रेस वे दहा पदरी असणार आहे.

नगर जिह्यातील या एक्स्प्रेस वेचे अंतर 124 किलोमीटर असणार आहे. तर, पुणे ते संभाजीनगर 270 किलोमीटरचे अंतर असणार आहे. सध्या असलेल्या नगर-संभाजीनगर रस्त्याने जाणाऱया वाहनांचा ताशी वेग 60 ते 80 किलोमीटरचा आहे.