पुणे – श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती (Dagdusheth Ganpati) हे पुणेकरांचे आणि भक्तांचे लाडके आराध्य-दैवत! श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती (Dagdusheth Ganpati) म्हणजे पुणे शहराच्या (pune) गौरवाभिमानाचा सर्वोच्च कळस म्हणता येईल. दरम्यान, लक्ष्मीबाई दगडूशेठ हलवाई दत्तमंदिर (dagdusheth datta mandir) ट्रस्टतर्फे शतकोत्तर रौप्यमहोत्सवी वर्षानिमित्त दत्तमंदिरामध्ये (dagdusheth datta mandir) त्रिपुरारी पौर्णिमेच्या दिवशी अन्नकोट करण्यात आला.

यावेळी नमकीन पदार्थ, फळे, खाद्यपदार्थ, चॉकलेट, बिस्किटे आणि विविध प्रकारची मिठाई अशा १२५ मिष्टान्नांचा अन्नकोट करण्यात आला. तसेच फुलांची आणि पणत्यांची केलेली आकर्षक सजावट पुणेकरांचे लक्ष वेधून घेत होती.

यावेळी, मंदिराचे प्रवेशद्वार व गाभारा फुलांच्या माळांनी तसेच रांगोळीने सजविण्यात आले. दत्तमंदिरातील अन्नकोट पाहण्यासाठी भाविकांनी सकाळपासून मोठी गर्दी केली होती.

उत्सव उपप्रमुख युवराज गाडवे यांच्या वतीने काका हलवाई तर्फे अन्नकोटाला विशेष सहकार्य करण्यात आले. अन्नकोटासाठी मांडण्यात आलेले पदार्थ सामाजिक संस्थांना देण्यात येणार असून उर्वरित पदार्थ मंदिरामध्ये भक्तांना प्रसाद म्हणून देण्यात येणार आहेत.

यावेळी ट्रस्टचे अध्यक्ष प्रताप परदेशी, कार्यकारी विश्वस्त शिवराज कदम जहागिरदार, महेंद्र पिसाळ, रजनी उकरंडे, सुनील रुकारी, पराग काळकर, राजू बलकवडे, अक्षय हलवाई यांसह पदाधिकारी आणि कर्मचारी मोठया संख्येने उपस्थित होते.

मंदिराचा संपूर्ण इतिहास…

महाराष्ट्रातील पुणे शहरातील श्री दत्त मंदिर (dagdusheth datta mandir) भक्ती हे भगवान दत्तात्रेयाला समर्पित भारतातील पहिले मंदिर आहे. श्री दत्त मंदिर हे प्रसिद्ध दगडूशेठ हलवाई गणपती मंदिर पुण्यापासून काही मिनिटांच्या अंतरावर आहे.

सुमारे 100 वर्षांपूर्वी, पुणे शहरातील श्री दगडूशेठ हलवाई यांच्या पत्नी श्रीमती लक्ष्मीबाई यांनी, इंदूरचे रहिवासी असलेले त्यांचे गुरु श्री माधवनाथ जी यांच्या आदेशानुसार दत्त मंदिराची स्थापना केली, जे भगवान दत्तांचे परम भक्त होते.

आठवड्यातील प्रत्येक गुरुवारी भगवान दत्तात्रेयांची मूर्ती आणि त्यांच्या पादुका पालखीत ठेवल्या जातात आणि रात्री 11:15 वाजता फेरफटका मारला जातो.

जी भगवान दत्तात्रेयांची पालखी यात्रा म्हणून ओळखली जाते. दर एकादशीला सायंकाळी साडेपाच वाजल्यापासून मंदिरात भजन-कीर्तनाचे आयोजन केले जाते.