पुणे – पुणे शहरातील (pune) वाहतूक कोंडी (traffic) ही दिवसागणित वाढतच चाली असून, सामान्य पुणेकर चांगलेच हैराण झाले आहेत. शहरातील सर्वच ठिकाणी गेल्या काही दिवसापासून पुणेकरांना (Punkear) वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत आहे. असं असताना दुसरीकडे पायी चालणाऱ्या नागरिकांना देखील काही गोष्टींचा मोठा त्रास सहन करावा लागत आहे.

सध्या शहरात वाहन चालकांना होणार्‍या त्रासाविषयी मार्ग काढण्यावर भर दिला जात असतानाच पादचारी मात्र दुर्लक्षित होत असल्याचं दिसून आलं आहे. पदपथांवरील अतिक्रमणातून वाट काढत आणि रस्ता ओलांडताना पादचार्‍यांना धावपळच करावी लागत आहे.

वाहतूक नियंत्रित करण्यासाठी ज्या पद्धतीने वाहतूक दिवे (traffic lights) असतात अशाचप्रकारची व्यवस्था पादचार्‍यांकरिता असावी, अशी मागणी सध्या होत आहे. देशांत पुणे महापालिकेने वाहतुकीसंदर्भात काही धोरणे तयार केली.

यामध्ये सर्वंकष वाहतूक आराखडा, बीआरटी प्रकल्प राबविला. त्याचप्रमाणे 2016 साली महापालिकेने पादचारी धोरण तयार केले, अशा प्रकारची देशातील पहीली महापालिका ठरली.

परंतु, गेल्या सहा वर्षांत या पादचारी धोरणावर फारशी कार्यवाही झाली नाही.त्यामुळे आता येणाऱ्या काळात शहरातील पादचारी मार्गांकडे देखील पालिकेने लक्ष द्यावी अशी मागणी नागरिक करत आहेत.

शहरातील 125 ठिकाणी अत्याधुनिक सिग्नल यंत्रणा बसविली जाणार आहे. त्यापैकी 30 चौकांत ही यंत्रणा प्राधान्याने बसविली जाणार आहे.

ही संपूर्ण यंत्रणा नव्याने बसविली जाणार असून, या मध्ये पादचारी वाहतूक दिव्यांचा समावेश आहे, असा दावा प्रशासनाकडून केला जात आहे.

पुण्यातील रस्त्यांचा सर्वांत जास्त वापर करणार्‍या पादचार्‍यांच्या सुरक्षिततेकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे. महत्त्वाच्या चौकात पादचार्‍यांसाठी वाहतूक दिव्यांची व्यवस्थाच नाही. शहरात मोजक्याच ठिकाणी तशी व्यवस्था असल्याचं दिसून येत आहे.