पुणे – राज्यातील अपघात सत्र (Maharashtra Accident Latest News) कमी होताना दिसत नाहीये उलट गेल्या काही दिवसांपासून मोठ्या प्रमाणावर राज्यात अपघात होताना दिसून येत आहेत. दरम्यान, या अपघातांमध्ये मोठ्या संख्येने अपघात हे खाड्यांमुळे होत असल्याचे समोर आले. त्यामुळे राज्यासह पुण्यातील (Pune) खड्यांमुळं होणाऱ्या अपघातांचं प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळं जीव मुठीत घेऊन चालकांना वाहनं चालवावी लागत आहेत.

त्यामुळे ज्या रस्त्यांवर खड्डे आहेत, रस्ता खराब झाला असे स्पॉट शोधून रस्ते तत्काळ दुरूस्त करावेत, अशा मागणीचे पत्र पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता (amitabh gupta) यांनी महापालिका आयुक्तांना दिले आहे.

तसेच, या खाड्यांमुळे शहरात (Pune) वाहतूक कोंडी देखील चांगलीच निर्माण झाली आहे. त्याला जबाबदार वाहतूक पोलीस, नियोजन नाही, केवळ पावत्या करण्यावर भर, चौकात कोणीही नसणे, कोंडी झाली तरी पोलीस चौकात न येणे असा अनेक तक्रारी केल्या जातात.

त्यामध्ये काही तक्रारी या खऱ्याही असतील. मात्र, प्रत्येकवेळी पोलीसच चुकीचे असतात, असे म्हणणे योग्य नाही. कारण, शहरातील अनेक रस्त्यांवर खड्डे पडले. पावसामुळे रस्ते खराब झाले. रस्त्यांवर माती किंवा खडी पसरलेले.

त्यामुळे वाहतुकीचा वेग मंदावतो आणि कोंडी वाढते. त्यामुळे पोलीस आयुक्तांनी दिलेल्या सूचनेनुसार शहरातील खड्डे आणि खराब रस्त्याचे सर्वेक्षण करण्यात आले. त्यानुसार एक यादी सुद्धा जारी करण्यात आली आहे.

मात्र, पोलिसांकडून पुण्यातील प्रमुख भागात खड्डे असल्याचे पत्र देण्यात आले आहे. या पत्रा नंतर महापालिका आयुक्त काय भूमिका घेतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

पुण्यातील खड्डे पडलेले प्रमुख रस्ते… (पोलिसांनी दिलेल्या यादीनुसार)

 1. कोथरूड : वेदभवन चौक ते कोथरूड डेपो
 2. डेक्कन : गरवारे पूल ते खंडूजीबाबा चौक
 3. लकडी पूल, स्वातंत्र्य चौक ते रसशाळा या चौकातील दोन्ही अंतर्गत रस्ते
 4. शिवाजीनगर : संचेती रुग्णालय ते शिवाजीनगर आणि वीर चापेकर चौक ते शिवाजीनगर.
 5. खडकी : किर्लोस्कर ते गुरूद्वारा, पाचवड चौक ते आरगडे चौक आणि सीएफडी डेपो ते फॅक्‍टरी हॉस्पिटल.
 6. भारती विद्यापीठ : कात्रज चौक ते जुना बोगदा ते नवले पूल आणि पद्मावती चौक.
 7. सहकारनगर : महेश सोसायटी चौक ते पासलकर चौक आणि
  स्वामी विवेकानंद रस्ता.
 8. येरवडा : गुंजन चौक ते गोल्फ क्‍लब आणि पर्णकुटी चौक.
 9. बंडगार्डन : आरटीओ चौक ते शाहीर अमर शेख चौक आणि बोल्हाई चौक ते साधू वासवानी चौक.
 10. स्वारगेट : जेधे चौक ते गोळीबार मैदान चौक ते सेव्हन लव्हज चौक.
 11. सिंहगड रस्ता : नरवीर तानाजी मालुसरे रस्ता ते भूमकर चौक.
 12. वारजे : वारजे ते एनडीए रस्ता आणि उत्तमनगर रस्ता.
 13. चतुशृंगी : बालेवाडी चौक ते पॅनकार्ड आणि राजवाडा हॉटेल ते बाणेर फाटा आणि पुणे विद्यापीठासमोरील चौक.