पुणे – स्वारगेट बसस्थानकातून (swargate station) चोरीला गेलेली बस (Bus) चावणाऱ्याला चोरट्याला अखेर पोलिसांनी पकडले (Crime news) आहे. त्यानंतर बस आरटीओच्या ताब्यात देण्यात आली. विशेष म्हणजे बसचा ताबा पूर्वी या चोरट्याकडेच होता. विजय चाटे असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. याबाबत पुणे (Pune News) आरटीओतील मोटार वाहन निरीक्षक विजय सावंत यांनी फिर्याद दिली आहे. स्वारगेट येथील एसटी महामंडळाच्या पार्किंगमध्ये (swargate station) ही बस ठेवण्यात आली होती.

पोलिसांच्या माहितीनुसार, चाटेचा ‘टूर्स अ‍ॅण्ड ट्रॅव्हल्स’चा व्यवसाय आहे. वाहतूक नियमभंग करणार्‍या बसवर कारवाईसाठी आरटीओने मोहीम हाती घेतली होती.

या मोहिमेंतर्गत नोव्हेंबर २०२१ मध्ये आरटीओ प्रशासनाने रोड टॅक्स न भरल्याप्रकरणी खासगी ट्रॅव्हल्सवर कारवाई केली. यानंतर स्वारगेट येथे एसटी महामंडळाच्या पार्किंगमध्ये ही बस अडकवून ठेवण्यात आली होती.

यादरम्यानच्या कालावधीत चाटे याने पार्किंमधून ही बस पळवून नेली. मात्र, ही बस रस्त्यावर धावत असताना वाहतूक नियम मोडल्याने बसला दंड झाल्याचा संदेश मोबाइलवर आल्यानंतर बस चोरीला गेल्याचा प्रकार बसमालकाच्या लक्षात आला.

बसचा माग काढून स्वारगेट पोलिसांनी चोरट्याला पकडले. त्यानंतर बस आरटीओच्या ताब्यात देण्यात आली. याप्रकरणी दाखल गुन्ह्यात पोलिसांनी चाटे याला अटक केली आहे. सहायक पोलिस निरीक्षक प्रशांत संदे पुढील तपास करीत आहेत.

परभणी ‘आरटीओ’ येथे नोंदणी असलेल्या या बसवर २०१९ पासूनचा दंड थकित असल्याने ‘आरटीओ’ने कात्रज येथे कारवाई करून ही बस स्वारगेट येथे लावली होती.

मात्र, नोव्हेंबर २०२१मध्ये कारवाई झाल्यानंतर आरोपीने ही बस दंड न भरता परस्पर रस्त्यावर आणली होती. पोलिसांनी तांत्रिक पद्धतीने शोध घेऊन आरोपीला कोथरूड येथून अटक केली; तसेच नऱ्हे येथे लावण्यात आलेली बस जप्त केली.