पुणे – सध्या “हर हर महादेव’ (har har mahadev) या चित्रपटावरून चांगलेच वाद होताना दिसून येत आहे. या चित्रपटावरून मनसे आणि राष्ट्रवादी यांच्यात देखील चांगलाच वाद निर्माण झाला आहे. नुकतंच ठाण्याच्या विवियाना मॉलमध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून (MNS) या चित्रपटाचा (har har mahadev) मोफत शो ठेवण्यात आला होता. मात्र, त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड (jitendra awhad) आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी ठाण्याच्या विवियाना मॉलमध्ये जाऊन हर हर महादेव या चित्रपटाचा शो बंद पाडला होता.

हा शो बंद पाडताना जितेंद्र आव्हाड (jitendra awhad) यांनी एका प्रेक्षकाला मारहाण केली, असा आरोप त्यांच्यावर करण्यात आलाय. या मारहाणीप्रकरणी त्यांच्यावर गुन्हा सुद्धा दाखल करत करण्यात आला आहे.

दरम्यान, आता सर्व प्रकरणावर पालकमंत्री तथा उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी आपली प्रतिक्रिया दिली असून, जितेंद्र आव्हाडांचा चांगलाच समाचार देखील घेतला आहे.

चंद्रकांत पाटील म्हणाले की., “चित्रपटगृहात स्वतःचे पैसे खर्च करून गेलेल्या नागरिकांना बाहेर काढणे योग्य नाही. तुम्हाला एखादा चित्रपट आवडला नाही,

तर तुम्ही चित्रपटगृहाबाहेर गळ्यात फलक लावून आंदोलन करा व चित्रपट पाहू नका, असे आवाहन करा”, अशा शब्दांत चंद्रकांत पाटील यांनी जितेंद्र आव्हाड (jitendra awhad) यांच्यावर टीका केली. चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी पुण्यात पत्रकारांशी संवाद साधला.

ते पुढे म्हणाले, हा संघर्षाचा विषय आहे का? कायदा हातात घेतल्यानंतर जी शिक्षा व्हायची ती होणारच. सरकार सत्तेतून गेल्याचं सहन होत नसल्याने संघर्ष करण्याचा आव्हाड प्रयत्न करत आहेत, असे पाटील यांनी सांगितले.

दरम्यान आव्हाड यांना अटक झाल्यानंतर राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी “छत्रपती शिवाजी महाराजांच्या बदनामीच्या विरोधात लढणे, हा आजच्या महाराष्ट्रात गुन्हा झाला आहे”, अशी टीका केली होती.

त्यावर पाटील म्हणाले, ‘तुम्ही म्हणाल तोच इतिहास काय? तुम्हाला पाहिजे ते मांडायला हुकूमशाही आहे का? ही दादागिरी चालणार नाही. असं देखील ते यावेळी म्हणाले.