पुणे – सध्या पुणे शहरात मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी (Traffic issue) होत असल्याचे पाहायला मिळत आहे. आणि या त्रासाला आता सामान्य पुणेकर (Punekar) देखील चांगलाच वैतागला आहे. काहीदिवसांपूर्वीच पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता आणि मनपा आयुक्त विक्रम कुमार यांनी शहारात सुरू असलेल्या विविध प्रकल्पाची पाहणी केली.

यावेळी मनपा आयुक्त विक्रम कुमार यांच्या सोबत गणेश खिंड रस्ता, पुणे विद्यापीठ चौक, बाणेर, चांदणी चौक, नवले पूल आणि सिंहगड रस्ता परिसरात दोघांनी पाहणी केली.

शहरातील वाहतूक कोंडीला (Traffic issue) आणि रस्त्यांच्या दुरवस्थेला मेट्रोची कामे जबाबदार असल्याचा ठपका पोलीस आणि महापालिका प्रशासनाकडून यावेळी ठेवण्यात आला होता.

त्यानंतर आता महामेट्रोकडून (mahametro) शहरातील रस्ते दुरुस्तीची कामे आणि वाहतूक कोंडी (Traffic issue) टाळण्यासाठीच्या उपाययोजना सुरू झाल्या आहेत. मेट्रो (mahametro) कामासाठी रस्त्यांवर ठिकठिकाणी लावण्यात आलेल्या लोखंडी जाळ्या काढण्यात आले आहे.

तसेच नियमित दुरुस्ती, खड्डे बुजविणे, दुभाजकांची कामे करण्यास सुरुवात झाली आहे. दरम्यान, महापालिका आणि पोलिसांनी केलेल्या सूचनेनुसार वाहतूक कोंडी कमी करण्यासाठीच्या उपाययोजनांचा महामेट्रोकडून (mahametro) फेरआढावाही घेतला जाणार आहे.

मेट्रोच्या कामासाठी अवजड यंत्रांचा वापर करण्यात आल्याने अनेक रस्त्यांची दुरवस्था झालेली आहे. मेट्रोच्या (mahametro) कामांमुळे दुरवस्था झालेले रस्ते पूर्ववत करण्याची जबाबदारी मेट्रोची आहे, असे महापालिकेकडून स्पष्ट करण्यात आले होते.

रस्त्यांवरील खड्डे, ड्रेनेजेस दुरुस्ती, मॅनहोलची दुरुस्ती, जलवाहिनी दुरुस्ती, पादचारी मार्गाची दुरुस्ती मेट्रो प्रशासनाकडून सुरू करण्यात आली आहे.

तसेच, वनाज ते गरवारे तसेच पिंपरी-चिंचवड ते आरटीओ-बंडगार्डन येथील कामे संपल्याने बॅरिकेड हटवून रस्ता पूर्ववत करण्यात आला आहे. सध्या मेट्रोने या कामांकडे मोठ्या प्रमाणात लक्ष घातल्याचे पाहायला मिळत आहे.

मेट्रोकडून कामाच्या ठिकाणी लावलेल्या लोखंडी जाळ्यांमुळे वाहतुकीचा वेग संथ होऊन वाहतूक कोंडी होत आहे. आणि वाहन चालक सुद्धा हैराण होत असल्याचं पाहायला मिळत होत, मात्र, आता अनेक भागांमध्ये लावलेल्या या लोखंडी जाळ्या काढण्यात आल्या आहेत.