पुणे – ‘पुणे तिथे काय उणे’ ही म्हण तुम्ही ऐकलीच असेल. याचाच अर्थ पुण्यात (pune) अगदी काहीही शक्य आहे. याच पुण्यातील एक अजब व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. काल पुण्यात असाच एक किस्सा घडला आहे. एका प्रवाशाला बसमधून (bus stop) उतरायचं होतं. पण भावाचा स्टॉप (bus stop) काही आलेला नव्हता. पण तरीही त्याला उतरायचं होतं. मात्र, स्टॉप न आल्याने ड्रायव्हरने (driver) बस थांबवण्यास मनाई केली. तेव्हा या भावाने, असा काही बनाव केला की त्याचा हा व्हिडिओ (video) पाहून सर्वानीच आपले जोडले आहे.

झालं असं की…”पुणे परिवहनच्या बसमध्ये हा प्रसंग घडला. चिंचवडहून बालेवाडीला ही बस चालली होती. बसमध्ये बऱ्यापैकी प्रवासी होते. एका प्रवाशाला बसमधून उतरायचे होते. त्याला स्टॉपच्या पूर्वीच उतरायचं होतं.

पण ड्रायव्हरने मध्येच बस थांबवण्यास नकार दिला. ठरलेल्या स्टॉपला उतरा आणि हवे त्या ठिकाणी जा, असं ड्रायव्हरचं म्हणणं पडलं. पण मध्येच बस न थांबल्याने प्रवाशाने ड्रायव्हरच्या केबिनचे बटन दाबायला सुरुवात केली. त्याने ड्रायव्हर बधला नाही. त्यामुळे त्याने बोंबाबोंब मारायला सुरुवात केली.

वाचवा ओ वाचवा… ड्रायव्हरने मला किडनॅप केलं, असं तो जिवाच्या आकांताने म्हणू लागला. त्यामुळे बसबाहेरच्या प्रवाशांनी गाड्या थांबवल्या. बसमध्ये नेमकं काय चाललं हे पाहण्यास सुरूवात केली. दुसरीकडे प्रवाशाची बोंब सुरूच होती.

या घटनेचा व्हिडीओ सध्या व्हायरल झाला असून, या प्रवाशानं जो आकांड तांडव केला आहे तो पाहून तुम्ही देखील थक्कच व्हाल. व्हायरल झालेल्या या व्हिडिओवर अनेकांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.