पुणे – मनसेचे पुण्यातील (pune) स्थानिक नेते वसंत मोरे (Vasant More) आणि पुण्यातील राष्ट्रवादीच्या नेत्या रुपाली ठोंबरे पाटील (Rupali Thombare Patil) यांचे पक्ष जरी वेगवेगळे असले तरी ते भाऊबीजेनिमित्त (Bhaubeej Celebration) ते एकत्र आले आहेत. नुकतंच त्यांनी एकत्र येत भाऊबीज साजरी (Bhaubeej Celebration) केली आणि आपल्यात कोणताही दुरावा नाही हे दाखवून दिले. राजकारण बाजूला ठेवून या दोन नेत्यांनी एकत्र येत भाऊबीज अतिशय आनंदाने साजरी केली आहे. तसंच नेत्यांमधले प्रेमाचे, नात्यांचे बंधही इथं दिसून आले.

रुपाली ठोंबरे(Rupali Thombare Patil) पूर्वी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेमध्ये होत्या. त्यानंतर त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. मनसेचे नेते वसंत मोरे (Vasant More) यांच्याशी त्यांचे जिव्हाळ्याचे संबंध होते.

मनसेत असताना दोघे दरवर्षी भाऊबीज साजरी करत असायचे. रुपाली ठोंबरे यांनी पक्ष बदलल्याने दोघांच्या नात्यात कटुता आली होती. मात्र यंदाच्या भाऊबीजेच्या निमित्ताने ती दूर झाली आहे. तब्बल दहा महिन्यांनंतर हे दोन नेते एकत्र आल्याचे यावेळी पाहायला मिळाले.

पुण्यात दोघांनीही भेटून भाऊबीज साजरी केली. यानंतर आपण तब्बल एका वर्षाने भेटत आहोत, असंही त्यांनी सांगितलं. शिवाय दोघांमध्ये आलेल्या कटुतेबद्दलही भाष्य केलं होतं. दोघांनी एकमेकांवर कितीही टीका केली तरी आमचं नातं तुटणार नाही, अशी भावना या दोघांनीही व्यक्त केली आहे.

दोघेही रमले आठवणीत…

वसंत मोरे आणि रुपाली पाटील यांनी पक्षासाठी एकत्र काम केले होते, त्यानंतर दोघांनी आठवणी आणि किस्से सांगत या वर्षीची दिवाळी आणि भाऊबीज साजरी केली.

वसंत मोरे आणि रूपाली ठोंबरे पाटील यांनी एकमेकांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या. यंदाच्या दिवाळी आणि भाऊबीजेमुळे दोघांमधील दुऱ्यावाला पूर्ण विराम मिळाला आहे.