पुणे – दिवाळीचा उत्सव हा (Diwali) फराळ व फटाक्यांची आतीषबाजी, आकाशकंदील आणि पणत्यांच्या प्रकाशाने उजळून निघणारा आहे. दिवाळी (Diwali) हा दिपोत्सावाचा सण, “ज्या ठिकाणी अंधार आहे, त्या ठिकाणी उजेड देणे’ हाच संदेश या सणाचा आहे. गेल्या दोन वर्षांपासून करोना (Corona) महामारीच्या साथीमुळे सर्वांनाच दिवाळीचा सण निर्बंधांमध्ये साजरा करावाला लागला होता. मात्र, यंदाच्या वर्षी करोनाचा (Corona) आलेख पूर्ण पणे खाली आला असून, मोठ्या आनंदात दिवाळीचा (Diwali) सण साजरा होताना दिसून येत आहे.

दरम्यान, दोन वर्षे महासाथीमुळे दिवाळीत फटाक्यांचा ‘क्षीण क्षीण’ आनंद लाभलेल्या नागरिकांनी यंदा फटाक्यांची पुरती हौस भागवली आहे. लक्ष्मीपूजनाच्या दिवशी पुण्यात मोठ्या प्रमाणात फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली. यावेळी सर्वत्र आनंदाचे वातावरण पाहायला मिळाले.

मात्र, अश्यातच शहरात काही ठिकाणी गंभीर घटना देखील घडल्याचं पाहायला मिळालं. ऐन दिवाळीच्या दिवशी रंगीबेरंगी पाऊस पेटवत असताना अचानक स्फोट होऊन मोठा अनर्थ घडला आहे. यावेळी परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

झालं असं की., पुण्यातील नव्हेमध्ये सोमवारी लक्ष्मीपूजनानंतर शिवांश फटाके फोडत होता. त्यावेळी रंगीबेरंगी पाऊस लावताना अचानक स्फोट झाला. या स्फोटात शिवांश अमोल दळवी हा गंभीर जखमी झाला. आणि त्याला तात्काळ जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले.

मात्र, या स्फोटाच्या घटनेतून शिवांश अगदी थोडक्यात वाचला. तो जखमी झाल्यामुळे त्याचे पालकही धास्तावले आहेत. आणि आता शिवांशची प्रकृती स्थिर आहे. त्यामुळे फटाके फोडताना काळजी घ्यावी असं आवाहन केलं जात आहे.

तसेच, लहान मुलांना शक्यतो एकटं फटाके फोडायला पाठवू नये, असंही गरज व्यक्त केली जातेय. फटाके फोडण्याच्या उत्साहावर गालबोट लागू नये, यासाठी अधिक खबरदारी बाळगावी आणि पालकांनी मुलांसोबत सतर्क राहावं हे या घटनेतून अधोरेखित झालं आहे.

दरम्यान, पुण्यात ऐन लक्ष्मीपूजनाच्या दिवशी तब्बल 17 ठिकाणी आगीच्या (Pune Fire News) घटना घडल्या आहेत. फटाक्यांच्या आतषबाजीत ही आग लागल्याचं समोर आलंय. यात कुठेही जीवितहानी झाली नसली, तरी आता काळजी घेण्याचं आवाहन केलं जातंय.