पुणे – दोन वर्षानंतर पुन्हा एकदा ‘महाराष्ट्र केसरी’ (Maharashtra Kesri) कुस्तीचा थरार सुरु झाला असून, यंदाच्या ‘महाराष्ट्र केसरी’ स्पर्धेचं यजमानपद पुणे शहराला मिळालं आहे. करोना (corona) निर्बंध शिथील झाल्यामुळं महाराष्ट्र कुस्तीगीर परिषदेनं या स्पर्धेच्या आयोजनाचा निर्णय घेतला असून, मागच्या वर्षी कुस्ती स्पर्धा साताऱ्यात आयोजित केली होती. मात्र, यंदाचा ‘महाराष्ट्र केसरी’चा (Maharashtra Kesri) मान हा पुणेकरांना (Pune) मिळाला असून, कुस्तीचा हा आखाडा पुण्यात रंगणार आहे.

महाराष्ट्र केसरी (Maharashtra Kesri) स्पर्धेचा थरार पुणेकरांना या वर्षाच्या अखेरीस कोथरूडमध्ये अनुभवायला मिळणार आहे. 900 कुस्तीगीर यांच्या सहभागात डिसेंबरमध्ये ही स्पर्धा होणार आहे, अशी माहिती माजी महापौर मुरलीधर मोहोळ (murlidhar mohol) यांनी दिली आहे.

33 जिल्ह्यातील 11 महापालिकांमध्ये 45 तालीम संघातील 900 मल्ल स्पर्धेत होणार सहभागी होणार आहेत. नामांकित 40 मल्ल सुद्धा घेणार या स्पर्धेत भाग घेणार आहेत.

दरम्यान, आता या स्पर्धेसाठी मनसे अध्यक्ष राज ठाकरेंना (raj thackeray) आव्हान देणारे भाजपा खासदार ‘बृजभूषण सिंह’ (Brij Bhushan Sharan Singh) महाराष्ट्रात येणार आहेत. त्यामुळे राजकीय फड रंगण्याची चिन्ह दिसत आहेत.

माजी महापौर मुरलीधर मोहोळ यांनी 20 ते 25 डिसेंबरदरम्यान पुण्यात ‘महाराष्ट्र केसरी स्पर्धे’चं आयोजन केलं आहे. या स्पर्धेसाठी भारतीय कुस्तीगीर महासंघाचे अध्यक्ष बृजभूषण सिंह (Brij Bhushan Sharan Singh) उपस्थित राहतील.

बृजभूषण सिंह (Brij Bhushan Sharan Singh) यांनी राज ठाकरेंच्या (raj thackeray) अयोध्या दौऱ्याला आव्हान दिलं होतं. मात्र, राज ठाकरेंनी प्रकृतीच्या कारणास्तव तेव्हा दौरा रद्द केला होता.

पण, बृजभूषण सिंह महाराष्ट्रात येणार असल्याने महाराष्ट्र नवनिर्माण सेना कोणती भूमिका घेते? याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत. राज ठाकरेंनी उत्तर भारतीयांविरोधात घेतलेल्या भूमिकांमुळे त्यांनी माफी मागावी.

अन्यथा उत्तर प्रदेशात पाय देखील ठेऊ देणार नसल्याचं आव्हान बृजभूषण सिंह यांनी दिलं होतं. त्यामुळे चांगलेच वातावरण तापले होते. मात्र, आता येणाऱ्या काळात पुण्यात मनसे कोणती भूमिका घेणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.