पुणे – मंगळवारी (2 ऑगस्ट) एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या गटातील आमदार उदय सामंत (Uday Samant) यांच्या वाहनावर पुणे शहरातील कात्रज (pune katraj) परिसरात हल्ला करण्यात आला. या हल्ल्यात उदय सामंत (Uday Samant) यांच्या वहानाची मागची काच फुटली. यावेळी जोरदार घोषणाबाजी देखील करण्यात आली. मात्र, आता शिंदे गटाकडून देखील जोरदार प्रत्युत्तर देण्यात येणार आहे.

शिवसेनेचे युवा सेनाप्रमुख व आमदार ‘आदित्य ठाकरे’ (aaditya thackeray) यांची देखील मंगळवारी पुण्यातील कात्रज चौकात सायंकाळी सभा आयोजित करण्यात आली होती.

ही सभा आटोपल्यानंतर शिवसेनेचे काही कार्यकर्ते तेथून जात होते. आणि याच दरम्यान, त्यांना शिवसेनेचे बंडखोर आमदार उदय सामंत (Uday Samant) यांची चारचाकी गाडी दिसली.

यानंतर कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी करण्यास सुरुवात केली. तर काही कार्यकर्त्यांनी उदय सामंत (Uday Samant) यांच्या गाडीच्या काचा फोडल्या. मात्र, त्यानंतर पोलिसांनीही कारवाई करत आरोपींना अटक केली.

दरम्यान, आता या सर्व प्रकरणानंतर शिंदे गटाकडून सामंतांवर झालेल्या हल्लाला प्रत्युत्तर दिलं जाणार आहे. ‘ज्या कात्रज चौकात सामंत यांच्यावर हल्ला झाला, तिथेच सामंत यांची जाहीर सभा घेतली जाणार आहे’.

जाहीर सभेच्या माध्यमातून उदय सामंत (Uday Samant) यांच्यावर झालेल्या या हल्ल्याला प्रत्युत्तर देणार आहेत. शिंदे गटाचे पुणे शहरप्रमुख प्रमोद भानगिरे यांनी अशी माहिती दिली आहे.

उदय सामंतांवरील हल्ल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे काय म्हणाले….

या हल्ल्याची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी देखील दखल घेतली असून. ते म्हणाले की, “गाडीवर दगड मारून पळून जाणं ही मर्दुमकी नाही’. कायदा आणि सुव्यवस्था राखणं हे काम पोलिसांचं आहे.

कोणी भडकावू भाषण करून चिथावणी देण्याचं काम करत असेल तर पोलीस कायदेशीर कारवाई करतील, असा इशाराही एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी दिला.