पुणे – वेदांता-फॉक्सकॉन प्रकल्पानंतर (Vedanta-Foxconn Project) C-295 लष्करी ट्रान्सफोर्ट एअरक्राफ्ट प्रकल्पही गुजरातला गेल्यानंतर राजकीय वातावरण तापले असताना, अश्यातच आणखी एक मोठा उद्योग प्रकल्प आता महाराष्ट्राबाहेर गेला आहे. प्रशासनाच्या दिरंगाईमुळे नागपूरच्या मिहानमध्ये होणारा ‘सॅफ्रन’ (Safran Project) कंपनीचा प्रकल्प हैदराबादला गेल्याचं समजत आहे. त्यामुळे ‘वेदांता फायरफॉक्स’ आणि ‘टाटा-एअरबस’ यानंतर आता आणखी एक प्रकल्प महाराष्ट्राबाहेर गेल्याने सत्ताधारी-विरोधकांमधील वाद आणखी वाढल्याचं पाहायला मिळत आहे.

सॅफ्रन ग्रुप (Safran Project) मिहानमध्ये 1185 कोटींची गुंतवणूक करण्यास उत्सुक होता. विमान तसंच रॉकेट इंजिन बनवणाऱ्या या कंपनीने मात्र आता महाराष्ट्रातून माघार घेतली असल्याची माहिती मिळत आहे.

हा प्रकल्प आता हैदराबादला गेला आहे. जागा मिळण्यास उशीर झाल्याने प्रकल्प महाराष्ट्राबाहेर गेल्याची माहिती मिळत आहे. या प्रकल्पामुळे 500 ते 600 कामगारांच्या हाताला रोजगार मिळणार होता.

सॅफ्रन ग्रुपने महाराष्ट्र एअरपोर्ट डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनकडे (एमएडीसी) ही जागा घेण्यासाठी संपर्क साधला होता. मात्र जागा मिळण्यास विलंब होत असल्याने हा प्रकल्प हैदराबादला गेला आहे.

दरम्यान, आता हा प्रकल्प राज्याच्या बाहेर गेल्यामुळे राजकीय वातावरण चांगलेच तापले असून नेत्यांनी एक मेकांवर आरोप करण्यास सुरुवात केली आहे. शिंदे – फडणवीस सरकारवर सुद्धा विरोधी पक्षातील नेते टीका करताना दिसून येत आहे.

या सर्व राजकीय आरोप प्रत्यारोपा दरम्यान पुण्यातील (Pune) फर्ग्युसन रोड, जंगली महाराज रोडवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बाळासाहेबांची शिवसेनेच्या युवा सेनेमार्फत ठिकठिकाणी शिवसेना

(उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्ष प्रमुख माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे (uddhav thackeray) यांचा एकेरी उल्लेख करणारे, ‘उद्धवचा वाटा महाराष्ट्राचा घाटा’ असे फ्लेक्स लावले आहेत.

त्यावर उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना. महाराष्ट्रामधून किती प्रकल्प कधी आणि कुठे गेले आहेत. त्या नावाची यादी प्रसिद्ध करून उद्धव ठाकरे (uddhav thackeray) यांना लक्ष्य करण्यात आले आहे. हे फ्लेक्स शहरातील नागरिकाचे लक्ष्य वेधून घेत असून, सर्वत्र चर्चा होताना दिसत आहे.