पुणे – पुणे शहरातील (pune) वाहतूक कोंडी (traffic) ही दिवसागणित वाढतच चाली असून, सामान्य पुणेकर चांगलेच हैराण झाले आहेत. शहरातील सर्वच ठिकाणी गेल्या काही दिवसापासून पुणेकरांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत आहे. पुण्यातील चांदणी चौका प्रमाणेच इतर भागामध्ये सुद्धा तासन् तास वाहनांच्या (traffic) रांगा लागलेल्या असतात. त्यामुळे शहरातील ही वाहतूक कोंडी कधी फुटणार असा सवाल नेहमीच पुणेकरांच्या मनात उपस्थित होत असतो.

काही दिवसांपूर्वीच राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मर्सिडीज बेंझचे सीईओ मार्टिन श्वेंक यांना देखील पुण्याच्या वाहतूक कोंडीचा फटका बसला होता. त्यानंतर आता आणखी एका बड्या नेत्याला या वाहतूक कोंडीचा फटका बसला आहे.

केंद्रीय अन्न प्रक्रिया आणि जलशक्ती राज्यमंत्री प्रल्हादसिंग पटेल (Union Minister Pralhad Singh Patel ) आज शुक्रवारपासून दोन दिवसांच्या बारामती दौऱ्यावर येणार आहेत. या दौऱ्यात सुकाणू समिती पदाधिकारी बैठक, कार्यकर्ता मेळावा, शेतकरी आणि महिला बचत गटांचा मेळावा ते घेणार आहेत.

दरम्यान, प्रल्हादसिंग पटेल (Union Minister Pralhad Singh Patel ) यांना आज शुक्रवारी पुण्यातील नऱ्हे येथील पार्टीच्या बैठकीला जाताना येताना वाहतुकीचा फटका बसला. पारी कंपनी चौक- श्री कंट्रोल- एस.के. बँक्वेट हॉल या अर्धा किलोमीटर परिसरात रोज वाहतूक कोंडी असते.

आज देखील तीच परिस्थिती होती. मंत्री महोदयांच्या दौरा १० वाजता पोचला. त्यावेळी, नऱ्हे या औद्योगिक क्षेत्र असल्याने या परिसरातील कंपनीत येणारा कामगार वर्ग, शहराच्या वेगवेगळ्या भागात जाणारे कामासाठी जाणारे नागरिक यामुळे रस्त्यावर गर्दी होती.

अशा प्रकारे जाणारे- येणारे विद्यार्थी व कामगार वर्ग यामुळे वाहतूक कोंडी होत असते. आजच्या या दौऱ्यामुळे सिंहगड रोड वाहतूक पोलिसांची व ग्रामीण पोलिसांची धावपळ उडाली होती.

मंत्रीमहोदय खडकवासला येथील केंद्रीय जल आयोगाच्या विश्रामगृहात मुक्कामी होते. तेथून ते नऱ्हे येथील बँक्वेट हॉल मधील कार्यक्रमास आले होते.

तेथून ते नांदेड चव्हाण बाग, धायरी उंबऱ्या गणपती चौक, पारी चौक असा त्यांचा कार्यक्रम ठिकाणी जाण्यासाठीचा मार्ग होता. जाताना त्यांना धायरी गावातील चौक, पारी कंपनी चौक, श्री कंट्रोल चौक या चौकात गर्दी होती.

त्यामुळे या गर्दीचा फटका प्रल्हादसिंग पटेल यांना बसल्याच पाहायला मिळालं. दहा वाजता सुरू झालेली बैठक बारा वाजता संपली त्यानंतर मंत्रीमहोदय मुळशीकडे गेली.