पुणे – शहरात काही दिवसांपूर्वी गाई आणि म्हशींचे (Milke) दूध (Pune Police) वाढवण्यासाठी ऑक्सिटोसीन औषधांचा वापर करणाऱ्या टोळीचा पुणे पोलिसांनी पर्दाफाश केला होता. याप्रकरणी आता गोठा मालक रडारवर आहेत. पुणे पोलिसांनी (Police) आणि पिंपरी चिंचवड परिसरातील सहा गोठे मालकांवर कारवाई (Crime) केली असून, या घटनेमुळे सगळीकडे खळबळ उडाली आहे.

या गोठे मालकांनी जास्त दुधाच्या (Milke) आमिषापोटी प्राण्यांवर ऑक्सिटोसीन या औषधांचा वापर केल्याचे निष्पन्न झाले. विठ्ठल भिवाजी झिंजुर्डे (वय 48, झिंजुर्डे मळा, पिंपळे सौदागर), सागर कैलास सस्ते (वय 35, रा. सस्ते मळा, आळंदी रस्ता, मोशी),

विलास महादेव मुरकुटे (वय 57, रा. मारुंजी, ता. मुळशी, जि. पुणे), सुनील खंडप्पा मलकुनाईक (वय 51, रा. हरेकृष्णा पार्क, टिंगरेनगर, धानोरी रस्ता), गणेश शंकर पैलवान (वय 50, रा. डायस प्लाॅट, गुलटेकडी),

महादू नामदेव परांडे (वय 51, रा. दिघी, आळंदी रस्ता) अशी अटक करण्यात आलेल्या गोठे मालकांची नावे आहेत. ही कारवाई सहाय्यक आयुक्त गजानन टोम्पे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक निरीक्षक लक्ष्मण ढेंगळे व त्यांच्या पथकाने केली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, ऑक्‍सिटोसीन या औषधांचा साठा करुन तो शहर, जिल्ह्यासह राज्यभरातील गाई, म्हशींच्या मालकांना विक्री करणाऱ्या पश्‍चिम बंगालमधील टोळीला पोलिसांनी बेड्या (pune crime) ठोकल्या आहेत.

या कारवाईमध्ये तब्बल 53 लाख 52 हजार रुपये किंमतीचा ऑक्‍सिटोसीन औषधांचा साठा जप्त करण्यात आला होता. ही कारवाई अमली पदार्थ विरोधी पथक एक यांनी लोहगाव येथील कलवडी वस्ती येथे शनिवारी (दि.5) केली.

या कारवाईत पोलिसांनी समीर कुरेशी (रा. उत्तर प्रदेश), बिश्वजित जाना, मंगल गिरी, सत्यजीत मोन्डल, श्रीमंता हल्दर (सर्व रा. पश्चिम बंगाल) यांना अटक केली आहे.

त्यानंतर या टोळीतील मुख्य आरोपी बाबूभाई याला अटक केल्यानंतर त्याच्याकडे केलेल्या चौकशीत या मालकांची नावे निष्पन्न झाली होती. त्यानुसार पोलिसांनी या गोठे मालकांवर कारवाई (Crime) करत त्यांना अटक केली आहे.