पुणे – राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Governor Bhagat Singh Koshyari) पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत ते त्यांच्या वादग्रस्त वक्तव्यामुळे. “छत्रपती शिवाजी महाराज तर जुन्या युगातील आहेत. नव्या युगात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांपासून ते डॉक्टर नितीन गडकरी पर्यंत इथेच आदर्श मिळतील,” असे भगतसिंह कोश्यारी म्हणाले. औरंगाबादच्या मराठवाडा विद्यापीठाकडून केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद (Sharad Pawar) पवार यांना डी. लिट ही पदवी देण्यात आली. या सोहळ्यानंतर बोलताना राज्यपाल कोश्यारी यांनी असे म्हटलं आहे.

दरम्यान, त्यांच्या या बेताल व्यक्तव्यानंतर राज्यपालांवर सर्वच स्तरातून जोरदार टीका होत आहे. अश्यातच आता पुण्यात चक्क विश्व हिंदू मराठा संघाच्या (Vishwa Hindu Maratha Sangh) वतीने कोश्यारींची थेट अंतयात्रा काढण्यात आली होती.

राज्यपालांच्या विधानाने विश्व हिंदू मराठा संघ आक्रमक झालाय. राज्यपालांची प्रतिकात्मक अंत्ययात्रा काढण्यात आली आहे. तसंच राज्यपाल कोश्यारी यांच्याविरोधात घोषणाबाजी करण्यात येत आहे.

राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावर केलेल्या विधानानंतर आंदोलन करण्यात आलं. आंदोलन करणाऱ्या सगळ्यांना आंदोलांना पोलीसांनी ताब्यात घेतलंय.

पुण्यातील चतु:र्शृंगी मंदिरापासून राजभवनापर्यंत अंतयात्रा काढण्यात येणार होती मात्र त्या आधीच पोलिसांनी आंदोलकांना ताब्यात घेतलं.

या आंदोलनाला पोलिसांची परवानगी नव्हती. मात्र तरिही हे आंदोलन करण्यात आलं. यावेळी आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेतलं असून, पुढील तपस सुरु आहे.