पुणे – शहरात (Pune news) आज एक अनोळखी घटना घडल्याचं पाहायला मिळालं आहे. पुण्यात एका चोरट्याने चक्क श्वानाची (Dog) चोरी केली आहे. ही सगळी घटना सीसीटीव्ही मध्ये कैद झाली असून, या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. पुण्यातील कॅम्प परिसरात ही घटना घडली आहे. याप्रकरणी आता श्र्वानाचे (siberian husky dog) मालक मोजीस डिसूजा यांनी पोलिसात (police) तक्रार (Crime) देखील नोंदवण्यात आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पुण्यातील कॅम्प परिसरातून एका भुरट्याच चोराने सायबेरियन हस्की प्रजातीच्या कुत्र्याला (siberian husky dog) पळवून नेल आहे. 28 ऑक्टोबर रोजी च्या मध्यरात्री चोराने मेसी नावाच्या श्वानाची केली चोरी आहे.

डिसूजा हे सेवानिवृत्त असून कॅम्प परिसरात दस्तूर मेहेर रोडवर त्यांच घर आहे. ते त्यांची पत्नी आणि मुलगा यांच्यासह इथे राहतात. त्यांच्याकडे सायबेरियन हस्की प्रजातीचे श्वान ज्याचे नाव त्यांनी “मेस्सी” (siberian husky dog) ठेवले होते.

28 ऑक्टोबर रोजी डिसूजा यांचा मुलगा क्लिंटन यांनी मेसीला रात्री फिरवून आणल्यानंतर मुख्य दरवाजाच्या बाहेर लोखंडी दरवाजाला साखळीने बांधून ठेवले होते. मात्र सकाळी सात वाजता जेव्हा दरवाजा उघडला तेव्हा मेस्सी तिथे नव्हती.

डिसुझा यांनी आजूबाजूच्या परिसरात मेसीला शोधलं मात्र त्यांना ती सापडली नाही. त्यांनी जवळच्या अनेक ठिकाणाहून सीसीटीव्ही फुटेज तपासले असता त्यांना एक इसम मेस्सीला घेऊन जात असल्याचे निदर्शनास आले.

त्यांनी पोलिसांकडे धाव घेतली असून तक्रार देखील दिली आहे. दरम्यान, डिसूजा यांनी दोन वर्षांपूर्वी सायबेरियन हस्की प्रजातीचे श्वान 35000 रुपयांना घेतले होते. या प्रकरणी एका अज्ञात व्यक्ती विरोधात कलम 379 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.