पुणे : भारतामध्ये ओमिक्रॉन (Omicron) या विषाणूचा (Virus) प्रसार हा अधिक प्रमाणात होत आहे. या विषाणूचा प्रसार हा अगोदरच्या कोरोना (Covid १९) विषाणूपेक्षा अधिक असल्याचा तज्ज्ञांचे मत आहे.
महाराष्ट्रात (Maharashtra) ओमिक्रॉन अधिक प्रमाण वाढत आहे. पुणे जिल्ह्यात (Pune District) कोरोनाच्या रुग्णसंख्येत घाट झाली असली तरी ओमिक्रॉन या विषाणूचे रुग्ण सापडायला सुरुवात झाली आहे.
जिल्ह्यात नव्याने ओमिक्रॉनचे १३ रुग्ण आढळून आल्याने प्रशासन (Administration) सतर्क झाले आहे. पुणे जिल्ह्यातील ओमिक्रॉनची एकूण रुग्णसंख्या ३५ झाली आहे. त्यामुळे प्रशासनाची डोकेदुखी वाढली आहे.
ओमिक्रॉनची वाढती रुग्णसंख्या लक्षात घेता पुणे महापालिका प्रशासन सर्तक (Municipal administration alert) झाले आहे. नागरिकांना सतर्क राहण्याचे आव्हान महापालिकेकडून करण्यात येत आहे.
महाराष्ट्रात गुरुवारी एकून ओमिक्रॉनचे २३ रुग्ण वाढले आहेत. त्यापैकी १३ रुग्ण हे महाराष्ट्रातीलच आहेत. नवीन सापडलेल्या रुग्णसंख्येमुळे जिल्ह्यातील रुग्णसंख्या ३५ झाली आहे.