पुणे : दक्षिण आफ्रिकेनंतर (South Africa) आता भारतातही ओमिक्रॉन (Omicron) कोरोनाचा नवा विषाणू धुमाकूळ घालत आहे. त्यामुळे प्रशासन चांगलेच सतर्क झाले आहे. जिल्ह्यातली ओमिक्रॉनची रुग्णसंख्या (District Omicron Patients) ही वाढतच चालली आहे.

महाराष्ट्रात (Maharashtra) बुधवारी एकूण ८५ ओमिक्रॉनचे रुग्ण सापडले आहेत. त्यामुळे प्रशासनाची चांगलीच डोकेदुखी वाढली आहे. तसेच बुधवारी पुण्यात ११ ओमिक्रॉनचे रुग्ण (Pune Omicron Patients) सापडले आहेत.

पुण्यात सापडलेल्या रुग्णांचा कोणताही आंतरराष्ट्रीय प्रवास नाही किंवा कोणत्याही विदेशातून आलेल्या प्रवाशांशी त्यांचा संपर्क नाही. त्यामुळे ओमिक्रॉनचा सामूहिक संसर्ग (Infection) सुरु झाल्याने भीती व्यक्त केली जात आहे.

Advertisement

या रुग्णांमध्ये पिंपरी चिंचवडमध्ये (Pimpari Chinchawad) 3, पुणे शहरात 2, अशा रुग्णांचा समावेश आहे. तर बाकीचे रुग्ण ग्रामीण भागातील आहेत. राज्यात ओमिक्रॉनची रुग्णसंख्या वाढतच चालल्याचे चित्र दिसत आहे.

राज्यात आतापर्यंत २५२ ओमिक्रॉनचे रुग्ण सापडले आहेत. यामुळे जिल्हा आणि राज्य प्रशासन सतर्क झाले आहे. रुग्णालये सज्ज करण्यात आली आहेत. ओमिक्रॉनचा वाढत धोका पाहता राज्यात ३१ डिसेंबरच्या पार्शवभूमीवर नियमावली जाहीर करण्यात आली आहे.

Advertisement