पुणे : आगामी महानगरपालिकेच्या निवडणुकांमुळे (Municipal Corporation Election) महानगरपालिकेने पीएमपीएमएलच्या(PMPML) कर्मचाऱ्यांना आनंदाची बातमी दिली आहे. यामध्ये ११ हजार कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग मंजूर करण्यात आल्याची माहिती स्थायी समितीचे अध्यक्ष हेमंत रासने (Hemant Rasne) यांनी दिली आहे.

महापालिकेच्या कर्मचाऱ्यांसाठी पुणे महापालिका (Pune Municipal Corporation) महिन्याला ६ कोटी, तर पिंपरी-चिंचवड महापालिका (Pimpri Chichawad Corporation) ४ कोटी रुपये देणार आहे.

या कर्मचाऱ्यांना पुणे महापालिका आपल्या हिश्‍श्‍याची २६१ कोटी ७६ लाख रुपयांची रक्कम पुढील पाच वर्षांत समान हप्त्याने देणार आहे. ही रक्कम पीएमपीला दरवर्षी दिल्या जाणाऱ्या संचलन तुटीतून वसूल केली जाणार आहे.

Advertisement

तसेच महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने महानगरपालिका पुण्यातील प्रदूषित नद्याच्या प्रदूषणास कारणीभूत ठरवत ९० लाखांचा दंड केला आहे. पुणेकर नागरिकांनी भरलेल्या करातून या रक्कमेची भरपाई महानगरपालिका करणार आहे.

शहरात घरगुती व या व्यवसायिक वापरासाठीच्या पाण्यावर कोणत्याही प्रकारची प्रक्रिया न करता ते थेट नदीत सोडले जाते. यामुळे प्रदूषणाची पातळी वाढली आहे.

या प्रदूषणाचा नागरिकांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होत आहे. तब्बला शहरातिल ४०टक्के पाणी कोणत्याही प्रक्रियेशिवाय नदीत सोडले जात आहे.

Advertisement

महाराष्ट्र प्रदूषण मंडळाने एप्रिल २०२१ पासून दरमहा १० लाख रुपये याप्रमाणे दंड आकारला असून, ही रक्कम महापालिकेच्या खात्यातून मंडळाकडे वर्ग करण्याचे पत्रदेखील नगरविकास विभागाला दिले आहे.

दरम्यान, एप्रिल २०२१ ते जानेवारी २०२२ या नऊ महिन्यांच्या कालावधीत महापालिकेला प्रतिमहिना दहा लाख याप्रमाणे ९० लाख रुपये इतकी दंड आकारणी करण्यात आली असून, यापुढेही ही दंड आकारणी कायम राहणार अशी माहिती समितीने दिली आहे.

Advertisement