पुणे: येथे रुग्णालयात उपचार घेण्यासाठी आलेल्या रुग्णाने संधी साधत रुग्णालयाचा संपर्क क्रमांक मिळवुन त्या नंबरवर अश्लिल मॅसेज, फोटो, व्हिडीओ पाठवले आहेत. त्यामुळे आरोपीवर गुन्हा दाखल केला आहे.

यामध्ये या गुन्हेगाराने आत्तापर्यंत 4महिला डॉक्टरचा विनयभंग केला आहे. आंध्रप्रदेशात राहणाऱ्या तिरुपतीराव गुम्मादीवर आयटी ऍक्ट अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला आहे. हा आरोपी महिला डॉक्टर वापरत असलेल्या रुग्णालयाच्या फोनवर 2018 ते जानेवारी 2022 पर्यंत अश्लिल मॅसेज, फोटो, व्हिडीओ पाठवत होता.

Advertisement

यामुळे 29 वर्षीय महिला डॉक्टरांनी कोरेगाव पार्क पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली. डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार या आरोपीला आरोग्याविषयी फॉलोअपसाठी २०१८ मध्ये रुग्णालयाचा संपर्क क्रमांक उपलब्ध करून देण्यात आला होता.

हा क्रमांक महिला डॉक्टर वापरत असे. तेव्हा पासून हा व्यक्ती महिला डॉक्टरांना त्रास देत होता.यामुळे सायबर पोलीसांच्या मदतीने या व्यक्तिवर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

Advertisement