पुणे : शहरातील कर्वेनगर पोलीस ठाण्यात (Karvenagar Police Station) विचित्र प्रकार घडला आहे. एक महिलेने (Woman) चक्क पोलीस अधिकाऱ्यांवरच (Police officers) दादागिरी (Bullying) केली आहे. वर्दीवरील स्टार (Uniform star) ओढत महिलेने गैरवर्तन केले आहे.

याप्रकरणी वारजे माळवाडी पोलीस ठाण्यात (Waraje Police Station) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सुनीता ज्ञानेश्वर दळवी यांनी तक्रार दिली होती यावरून पोलिसांनी गुन्हा (Crime) दाखल केला आहे.

संजना किरण पाटील (वय ४०) आणि मृणाल किरण पाटील (वय २१) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या महिलेची नावे आहेत. तरुणीने शेजारी राहणाऱ्या महिलेच्या मुलाला मारहाण केली होती.

Advertisement

तरुणीच्या आईने लोखंडी हत्याराने गाडीची तोडफोड केली होती. हे केल्यानंतर २१ वर्षीय तरुणी भावासोबत तक्रार देण्यासाठी कर्वेनगर पोलीस ठाण्यात गेली होती.

पोलीस ठाण्यात तरुणीची तक्रार दाखल करून घेऊनही तिने पोलीस अमंलदाराला शिवीगाळ करत मारहाण केली. तसेच चौकीतील पोलीस अधिकाऱ्याला ”ए तू हो बाजूला” म्हणत वर्दीवरील स्टार ओढले.

हा सर्व प्रकार एका श्वानाने (Dog) घरासमोर घाण केली म्हणून घडला आहे. तक्रारदार महिलेच्या श्वानाने आरोपी महिलेच्या घरासमोर घाण केली होती. त्यानंतर आरोपी महिलेने महिलेच्या मुलाला मारहाण केली.

Advertisement

त्यानंतर पोलिसांना ही मारहाण केली वर्दीवरचे स्टार ओढले. त्यामुळे पोलीस अंमलदार सुषमा घोळवे (Police officer Sushma Gholve) यांनीही २१ वर्षीय महिलेच्या विरोधात फिर्याद दिली आहे.