पुणे – पुणे शहर आणि परिसरात गुन्हेगारीचं प्रमाण दिवसागणित प्रचंड वाढत आहे. आता तर लहान – मोठ्या टोळ्यादेखील चांगल्याच सक्रिय आहे. या टोळ्यांना आळा घालण्यासाठी पुण्यातील गुन्हे शाखेचे प्रत्येक पोलिस अधिकारी (Pune Police) आणि कर्मचारी जीवापार प्रयत्न करत आहे. अनेकदा माहिती मिळाल्यावर रात्रीबेरात्री गुन्ह्याचा छडा लावण्यासाठी रवाना होतात. तर अनेकदा तातडीने सापळा रचून गुन्हेगाराला जेरबंद करण्यात यश मिळवतात. पोलीस कर्मचारी (Pune Police) आपल्या जीवावर बेतून कार्यरत असतात.

मात्र, पोलिस कर्मचाऱ्यांना बक्षिस म्हणून फक्त 100 रुपये जाहीर करण्यात आले आहे. तर दुसरीकडे धक्कादायक बाब म्हणजे पोलिस उपायुक्तांच्या गाडीच्या ड्रायव्हरला 21 हजारांचं बक्षीस देण्यात आलं आहे.

आणि गुन्ह्याचा छडा लावणाऱ्या पोलिसांना फक्त 100 रुपयाचं बक्षीस जाहीर झाल्याचे समोर आलं असून, एकच खळबळ उडाली आहे. नुकतीच पुणे पोलिसांची ही यादी (Pune Police Reward List) सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे. रिवॉर्डची यादी (Pune Police Reward List) ही 30 पानांची आहे.

गुन्हेगाराला पकडणं, त्या गुन्ह्याची उकल करणं यासाठी पोलिसांना पुरस्कार आणि पारितोषिकं दिली जातात. पुण्यातसुद्धा असे पुरस्कार देण्याची पद्धत आहे. पण हे पुरस्कार देताना पुणे पोलिसांचा एक अजब कारभार समोर आला आहे.

सध्या परिमंडळ 3 च्या आयुक्तांनी दिलेल्या रिवॅार्डची (Reward List) एक वादग्रस्त यादी सोशल मिडीया व्हायरल झाली आहे. या यादीमुळे पोलिसांमध्ये अनेक प्रश्न निर्माण झाले आहे.

परिमंडळ 3 च्या आयुक्त पौर्णिमा गायकवाड यांना वेळेत पोलीस आयुक्तालयात बैठकीसाठी नेलं म्हणून चार पोलीस शिपायांना प्रत्येकी 21 हजार रुपयांचं बक्षीस देण्यात आलं.

तर दुसरीकडे गुन्हे शाखेचे उपायुक्त राजकुमार गाडगे यांनी गुन्हेरीला आळा घालणाऱ्या पोलिसांना 50, 100, 150 ते 250 रुपये अशाप्रकारचं रिवॉर्ड देण्यात आलं आहे. तर दुसरीकडे गुन्ह्याचा छडा लावणाऱ्या पोलिसांना फक्त 100 रुपयाचं बक्षीस जाहीर करण्यात आलं आहे.

या रिवॉर्डवरुन पोलिसांचं खरं कर्तव्य बजावणाऱ्या कर्मचाऱ्यांपेक्षा आयुक्तांना वेळेत पोलीस मुख्यालयात बैठकीसाठी आणणं हे काम मोठं आहे का? अशी चर्चा पुणे पोलीस दलात सुरु आहे. पुणे पोलिस आयुक्तालयात 8 तारखेला ही यादी जाहीर झाली आहे.