पुणे – आज देशाचा अमृतमहोत्सवी स्वातंत्र्य दिन… संपूर्ण देशभरात आज स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवाचा जल्लोष पाहायला मिळत आहे. सकाळी साडेसात वाजता देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी (PM Modi) दिल्लीत लाल किल्ल्यावर ध्वजारोहण केलं. मात्र, यापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी महात्मा गांधी यांना आदरांजली वाहिली. यावर्षी पहिल्यांदाच स्वदेशी 21 तोफांची सलामी देण्यात आली आहे.

तसेच लाल किल्ल्यावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) जनतेला संबोधित देखील केलं. यंदाच्या स्वातंत्र्य दिनाची थीम ‘एक भारत, श्रेष्ठ भारत’ अशी आहे.

दरम्यान, देशभरात स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव (Azadi Ka Amrit Mahotsav) साजरा केला जात असला तरी, पुणे शहरात पोलिसांचे एक मोठे ऑपरेशन पार पडले आहे.

75 व्या स्वातंत्र्य दिनापूर्वी पुणे शहर पोलिसांनी (Pune city police) मोठ्या प्रमाणात कोम्बिंग ऑपरेशनमध्ये शुक्रवारी रात्री आणि शनिवारी पहाटे शहरातील तब्बल 3,381 हिस्ट्री शीटर्सची तपासणी केली.

कोम्बिंग ऑपरेशन दरम्यान पोलिसांनी विविध गुन्ह्यांमध्ये 61 जणांना अटक (Arrested) केली. काही आरोपींकडून पोलिसांनी दोन पिस्तूल, काडतुसे आणि 35 तीक्ष्ण हत्यारे जप्त केली आहेत.

तसेच, प्रतिबंधात्मक कारवाई म्हणून पोलिसांनी 419 हॉटेल्स आणि लॉज आणि 145 संवेदनशील ठिकाणे यासह रेल्वे स्टेशन, बस स्टँड आणि शहरातील इतर ठिकाणांची तपासणी केली.

कोम्बिंग ऑपरेशन (Combing operation) दरम्यान पोलिसांनी अवैध दारूच्या अड्ड्यांवरही कारवाई केली. तसेच, पोलिसांनी शहरातील 419 हॉटेल्स आणि लॉज, 145 एसटी, बस, ऑटो स्टँडवर शोधमोहीम राबवून

पाच पोलीस ठाण्यातून 13 गुन्हेगारांवर कारवाई केली. स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्‍वभूमीवर हे कोम्बिंग ऑपरेशन राबविण्यात आले, ज्याचा उद्देश गुन्हेगारी रेकॉर्ड, पाळत ठेवणारे, बाहेरील, वाँटेड आणि फरार गुन्हेगारांची तपासणी करणे हा आहे.

दरम्यान, ही कारवाई पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता, सहआयुक्त संदीप कर्णिक, अतिरिक्त पोलीस आयुक्त (गुन्हे) अशोक मोराळे यांच्या निरीक्षणा खाली करण्यात आली आहे.

यावेळी पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता म्हणाले की, “शहरातील कायदा आणि सुव्यवस्था नियंत्रणात ठेवण्यासाठी अशा प्रकारचे कोम्बिंग ऑपरेशन (Combing operation) भविष्यातही सुरूच राहतील. असं त्यांनी सांगितलं आहे.