Neera Nundy, Co-founder, Dasra

पुणे : प्रतिमा जोशी (Pratima Joshi) यांचा फोर्ब्स (Forbes) या आंतरराष्ट्रीय मासिकाने (Magazine) शक्तिशाली महिलांच्या यादीत त्यांचा समावेश केला आहे. प्रतिमा जोशी यांच्यावर फोर्ब्सने डिसेंबर २०२१ अंकामध्ये विशेष लेख (Article) प्रसिद्ध केला होता.

या लेखात त्यांचा सामाजिक कामात (Social work) अग्रेसर असल्याचा सन्माननीय उल्लेख करण्यात आला आहे. प्रतिमा जोशी यांचे राज्यातील ७ शहरांमध्ये आहे. मागील काही वर्षात त्यांनी २५ हजार शौचालयांचे (Toilet) बांधकाम केले आहे.

२५ हजार शौचालयांचे बांधकाम त्यांनी शेल्टर (Shelter) या संस्थेच्या माध्यमातून केले आहे. जोशी या व्यवसायाने वास्तुरचनाकार (Architect) आहेत. झोपडपट्टीतील (Slum) नागरिकांचा आरोग्य स्तर वाढवण्याचे काम १९८७ पासून त्या करत आहेत.

Advertisement

शौचालयांच्या बांधकामांबरोबरच झोपड्पट्टीमधील घरांना त्यांची स्वतःची ओळख गुगलच्या (Google) माध्यमातून देण्याचा जोशी यांनी यशस्वी प्रयत्न केला आहे. कचऱ्याचे योग्य व्यवस्थापन करण्यातही त्यांनी यश संपादन केले आहे.

प्रतिमा जोशी या पदवी शिक्षण (Degree education) पूर्ण झाल्यापासूनच समाजकार्यात उतरल्या आहेत. पहिल्यांदा त्यांनी झोपडपट्टीतील शौचालयाबाबत अभ्यास केला. त्यानुसार काम करण्यास सुरुवात केली.

पुणे, पिंपरी चिंचवड, कोल्हापूर, नवी मुंबई, ठाणे आणि अन्य काही नगरपालिकांमध्ये त्यांनी कामे केली आहे. गोखले संशोधन संस्थेने (Gokhale Research Institute) महिला आणि युवतींच्या आरोग्याची तपासणी केली. युरिनशी संबंधित आजारांचे प्रमाण ९३ टक्क्यांनी घातले असल्याचे समोर आले आहे.

Advertisement