पुणे – दिवाळीच्या (Diwali) कडची वाट धरली आहे. सध्या साप्ताहीक सुट्टी आणि दिवाळीनिमित्त गावाकडे जाणाऱ्या प्रवाशांची गर्दी दिसून येत आहे. शाळेतील सहामाहीच्या परीक्षा संपल्या आहेत. तसेच दिवाळीला (Diwali) सुरुवात देखील झाली आहे. त्याआधी आलेल्या साप्ताहीक सुट्टीची संधी साधून अनेकांनी गावी जाण्याचा निर्णय घेतला आहे.

त्याशिवाय, साप्ताहीक सुट्टी निमित्ताने सामान्य नागरिकांनी आता आपल्या घरचा रस्ता धरल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे विविध रेल्वेस्थानक तसेच बसस्थानकांवर प्रवाशांची मोठ्या प्रमाणात गर्दी होत आहे.

असे असताना पुण्यातील रेल्वेस्थानकावर (Pune Railway Station) एक दुर्दैवी घटना घडली आहे. ऐन दिवाळीत रेल्वेस्थानकावर एका प्रवाशाचा मृत्यू झाला आहे. याआधी पुणे रेल्वेस्थानकात (Pune Railway Station) चेंगराचेंगरी झाल्याचे सांगण्यात येत होते.

मात्र तशी कोणतीही घटना घडलेली नसून मृत्यू झालेला प्रवाशी फलाट क्रमांक 1 वर आला होता. रेल्वेस्थानकात येताच त्याचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती पुणे रेल्वेचे जनसंपर्क अधिकारी मनोज झंवर यांनी दिली आहे.

मृत प्रवाशाचे नाव साजन मांझी (35) असून तो मूळचा बिहार राज्यातील रहिवाशी आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, दानापूर रेल्वेगाडी फलाट क्रमांक एकवरुन शनिवारी रात्री नऊच्या सुमारास रवाना होणार होती.

त्यावेळी प्रवासी आणि त्याचे कुटुंबीय सर्वसाधारण डब्यात प्रवेश करत होते. मात्र अचानक प्रवाशाला त्रास झाला आणि तो फलाटावरच कोसळला. बेशुद्धावस्थेतील प्रवाशाला लाेहमार्ग पोलिसांनी रुग्णालयात दाखल केले. मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.

मृत्युमुखी पडलेला प्रवासी आजारी होता. दिवाळीनिमित्त तो कुटुंबियांसह मूळ गावी निघाला होता. मात्र, स्टेशनवरच त्याचा मृत्यू झाला. तसेच रेल्वेस्थानकात चेंगराचेंगरी झालेली नसून अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन पुणे रेल्वेच्या जनसंपर्क अधिकाऱ्याने केले आहे.