पुणे – गेल्या आठवडाभरापासून राज्यात पाऊस (Rain) पुन्हा एकदा जोर धरू लागला आहे. यामुळे ऐनवेळी पाऊस (Rain) पडत असून शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण (Atmosphere) निर्माण झाले आहे. वातावरणात बदल झाला असून, राज्यातील काही भागांमध्ये वेगवान वाऱ्यासह पावसाची (Rain) जोरदार बॅटिंग पाहायला मिळाली आहे. अचानक येणाऱ्या या पावसामुळे नागरिक सुद्धा चांगलेच हैराण झाले आहे.

अश्यातच पुणे (Pune) शहरात झालेल्या मुसळधार पाऊसामुळे (Heavy Rain) जनजीवन विस्कळीत झालं होतं. पुण्यातील अनेक भागात मोठ्या प्रमाणात पूर परिस्थिती देखील यामुळे निर्माण झाल्याचे दिसून आले.

दरम्यान, गेल्या आठवडय़ापासून राज्यात मुसळधार पाऊस होत असला, तरी दिवाळीच्या कालावधीत पाऊस विश्रांती घेणार आहे. येत्या चोवीस तासांमध्ये राज्यातून मोसमी वारे वेगाने परतीचा प्रवास करणार असल्याचेही स्पष्ट झाले आहे.

दक्षिण कोकण, पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाडय़ात तुरळक भागांतच पुढील एक-दोन दिवस हलका मध्यम स्वरूपाचा पाऊस राहणार असल्याचा अंदाज हवामान विभागाकडून व्यक्त करण्यात आला आहे.

परतीच्या पावसाने राज्याच्या विविध भागांत धुमाकूळ घातला आहे. शहरांमध्ये दाणादाण उडवून देण्यासह शेतीतेही मोठे नुकसान या पावसाने केले आहे. मोसमी वाऱ्यांच्या परतीच्या प्रवासाने आता वेग घेतला असून,

पुढील दोन दिवसांत मुंबई-पुण्यासह संपूर्ण राज्यासह देशातून मोसमी वारे माघारी जातील, अशी स्थिती सध्या निर्माण झाली आहे. दोन दिवसांच्या कालावधीत केवळ दक्षिण कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रात तुरळक भागांत हलक्या सरींची शक्यता आहे.

अरबी समुद्रातून येणाऱ्या बाष्पामुळे आठवडय़ापासून कोकणात काही ठिकाणी, तर पश्चिम महाराष्ट्रात पुणे, नगर, सातारा, कोल्हापूर, सांगली आदी भागांत जोरदार पावसाने हजेरी लावली. बाष्पाचे प्रमाण कमी होत नसल्याने राज्यातून मोसमी वाऱ्यांचा परतीचा प्रवासही लांबला आहे.