पुणे – उन्हाच्या तडाख्यानं बेजार झालेल्यांना पावसाची प्रतिक्षा असते. सर्वजण पावसाची (rain) वाट बघत असतात. पावसाळा (rain) सर्वांना सुखावणारा असतो. सध्या राज्यतील अनेक भागांमध्ये पावसाची (rain) जोरदार बॅटिंग सुरु असून, जिल्ह्यांमध्ये तर पूरपरिस्थिती निर्माण झाली असल्याचे दिसून येत आहे. पुणे शहरात (pune) आणि इतर परिसरात देखील गेल्या आठवड्याभरापासून जोरदार पाऊस पडत आहे.

दिवसभर राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसानं झोडपून काढलं आहे. तर दुसरीकडे या पावसामुळे काही प्रमाणात नुकसान सुद्धा झालं आहे.

मुसळधार पावसामुळे पुणे शहरात (pune city) वीस ठिकाणी झाडे उन्मळून पडली. अग्निशमन दलाच्या जवानांनी रस्त्यावरील झाडांच्या फांद्या हटवून वाहतूक सुरळीत केली. सुदैवाने या घटनेत कोणीही जखमी झाले नाही.

शहर (pune city) आणि परिसरात पुढील पाच दिवस पावसाचा मुक्काम राहणार असल्याचे वेधशाळेने सांगितले आहे. शुक्रवारी (दि. 8 जुलै) मध्यरात्रीपासून शहरात मुसळधार पाऊस पडत होता.

शनिवारी सायंकाळपर्यंत पावसाच्या जोरदार (rain) सरी कोसळत होत्या. शहराच्या (pune city) वेगवेगळ्या भागात झाडे कोसळली.

या घटनांची माहिती अग्निशमन दलाच्या मुख्य नियंत्रण कक्षाला मिळाल्यानंतर जवानांनी घटनास्थळी धाव घेऊन मदतकार्य सुरू केले. रस्त्यावर पडलेल्या झाडांच्या फांद्या हटवून वाहतूक सुरळीत केली.

दरम्यान, पुणे जिल्ह्यातील चाकण, राजगुरूनगर, मंचर आणि नारायणगाव या भागांमध्ये (pune dist rain) देखील गेल्या दोन दिवसांपासून तुफान पाऊस पडत असून, बळीराजा सुखावला आहे.

असाच पाऊस चालू राहिला तर धरण क्षेत्राला देखील मोठ्या प्रमाणात याचा फायदा होणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.