पुणे – उन्हाच्या तडाख्यानं बेजार झालेल्यांना पावसाची प्रतिक्षा असते. सर्वजण पावसाची (rain) वाट बघत असतात. पावसाळा (rain) सर्वांना सुखावणारा असतो. गेल्या काही दिवसांपासून राज्यतील अनेक भागांमध्ये पावसाची (rain) जोरदार बॅटिंग सुरु असून, काही जिल्ह्यांमध्ये तर पूरपरिस्थिती निर्माण झाली असल्याचे दिसून आले. पुणे शहरात (pune) आणि इतर परिसरात देखील जोरदार पाऊस (Heavy rain) झाला असून, सध्या तरी वरुणराजाने विश्रांती घेतल्याचे दिसून येत आहे.

दरम्यान, पावसाच्या या विश्रांती नंतर हवामान विभागाने महाराष्ट्राच्या काही भागांत मुसळधार पाऊस (Heavy rain) होईल असा अंदाज वर्तवला आहे.

23-24 जुलै रोजी कोकण आणि मध्य महाराष्ट्राच्या काही भागांत आणि 23-25 ​​जुलै रोजी विदर्भाच्या काही भागांत थोडा मुसळधार पाऊस होणार असल्याचे हवामान विभागाने सांगितलं आहे.

तर महाराष्ट्राच्या बहुतेक भागांमध्ये किमान 4 ऑगस्टपर्यंत मान्सूनची स्थिती विस्कळीत स्वरुपाची असेल, असेही भारतीय हवामानशास्त्र विभागाने म्हटले आहे.

पुणे (pune) आयएमडी येथील हवामान अंदाज विभागाचे प्रमुख अनुपम कश्यपी (Anupam Kashyapi) यांनी सांगितले, की मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भाच्या पश्चिम भागात

दिनांक 22 ते 28 जुलै या कालावधीत सामान्य किंवा किंचित कमी पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर कोकणात सरासरीपेक्षा कमी पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांनी सतर्क राहावे. असं ते म्हणाले.

तसेच, विदर्भातील काही भागांना यलो अलर्ट असणार आहे. तर पुणे, सोलापूर, सांगली, सातारा यासह इतर भागात मध्यम स्वरूपाची शक्यता आहे, असेही कश्यपी (Anupam Kashyapi) म्हणाले.

दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून पुणे शहर आणि जिल्ह्यात तुफान पाऊस पडत असून, बळीराजा सुखावला आहे. चाकण, राजगुरूनगर, मंचर आणि नारायणगाव या भागांमध्ये सुद्धा चांगला पाऊस झाल्याचे हवामान विभागाने सांगितलं.