पुणे – नुकतीच उन्हाळ्याची चाहूल लागली असताना पाऊस (Rain) पुन्हा एकदा जोर धरू लागला आहे. यामुळे ऐनवेळी पाऊस (Rain) पडणार असून शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण (Atmosphere) निर्माण झाले आहे. वातावरणात बदल झाला असून, गेल्या आठवड्याभरापासून राज्यातील काही भागांमध्ये वेगवान वाऱ्यासह पावसाची (Rain) जोरदार बॅटिंग पाहायला मिळाली आहे. अचानक येणाऱ्या या पावसामुळे नागरिक सुद्धा चांगलेच हैराण झाले आहे.

सोमवार आणि मंगळवारी रात्री पुण्यात (Pune rain) देखील मुसळधार पाऊस झाला. अग्निशमन दलाच्या जवानांनी पाण्यात अडकलेल्या एकूण 12 जणांची सुटका केली. मात्र, इतर घटनांत दोघांचा मृत्यू झाला.

सोमवारी रात्री साडेअकरापर्यंत दीड तासात शिवाजीनगरात 104 मिमी पावसाची नोंद झाली. मगरपट्टा 111 मिमी आणि पाषाणमध्ये 94 मिमी पाऊस झाला. पुणे स्टेशनमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी (Pune rain) घुसल्याने प्रवाशांची तारांबळ उडाल्याचे पाहायला मिळाले.

तर दुसरीकडे, मुसळधार पावसामुळे (Pune rain) चंदननगर पोलीस ठाण्यात पाणी शिरलंय. पोलीस कर्मचारी बसत असलेल्या कॅबिनपर्यंत हे पाणी पोहोचलं आहे. या पाण्यामुळे रोगराई वाढण्याची शक्यता आहे.

विशेष म्हणजे संकट काळात सर्वसामान्यांसाठी धावून जाणाऱ्या पोलिसांच्या कार्यालयातच पाणी शिरल्याने पाऊस किती भयानक होता याचा प्रत्यय येतोय. चंदननगर पोलीस ठाण्यात कशाप्रकारे पाणी साचलं आहे त्याचा व्हिडीओ देखील समोर आला आहे.

चंदननगर पोलीस ठाण्यापाठोपाठ कोथरुड कचरा डेपोमध्ये देखील प्रचंड पाणी शिरलं आहे. या कचरा डेपोतील गाड्या पाणीखाली गेल्या आहेत. जिकडे पाहावं तिकडे पाणीच पाणी, अशी परिस्थिती आहे.

यलो अलर्ट म्हणजे नेमकं काय? वाचा…

यलो अलर्ट म्हणजे नेमकं काय असा प्रश्न सगळ्यांना पडला असेल. तर या यलो अलर्टमध्ये हवामान खात्यानं हलक्या पावसाची शक्यता वर्तवलेली असते.

तसेच यलो अलर्ट हा सावध राहण्यासाठी दिला जातो. हा इशारा वॉचसाठी दिलेला असतो. जास्ती प्रमाणात पाऊस झाल्यास हा इशारा देण्यात येतो, त्यामुळे नागरिकांना साधवगिरी बाळगावी लागते.