पुणे – भोपाळ ते पुणे प्रवासादरम्यान धावत्या झेलम एक्स्प्रेसमध्ये (Jhelum Express Train) एका 14 वर्षीय मुलीवर बलात्कार (rape gir) झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. भोपाळ येथे 19 जुलै रोजी मध्यरात्री 12.30 मिनिटांनी बलात्काराची (rape gir) ही घटना घडली. एक अनाथ मुलगी ट्रेनच्या एसी डब्यात चढली होती. झेलम एक्स्प्रेसमध्ये (Jhelum Express rape gir) रेल्वेच्या पॅंट्री कारमध्ये काम करणाऱ्या रेल्वे कर्मचाऱ्याने तिला पकडले आणि एसी डब्यात तिच्या उपस्थितीबद्दल प्रश्नचिन्ह उपस्थित केले.

तसेच, त्याने या मुलीला तिकीट तपासनीसकडे सोपवण्याची धमकी दिली आणि पँट्री कारमध्ये तिच्यावर बलात्कार केला, (rape gir) अशी माहिती पोलिसांनी दिली.

धक्कादायक बाब म्हणजे ही घटना धावत्या झेलम एक्स्प्रेस ट्रेनमध्ये (Jhelum Express rape gir) घडली असून, सर्वत्र एकच खळबळ उडाली आहे. याप्रकरणी तिघांना पुणे जीआरपीने गुरुवारी अटक केली आहे.

मिळालेल्या माहिती नुसार, जेव्हा कर्मचाऱ्याने हे हैवानी कृत्य केलं. ही बाब जेव्हा लक्षात आली, तेव्हा पीडितेला भुसावळ रेल्वे स्थानकावर उतरवण्यात आलं होतं. पीडितेची जेव्हा सामाजिक संस्थेनं चौकशी केली,

त्यानंतर या हैवानी कृत्याबाबत पीडितेनं खुलासा केला. त्यानंतर एनजीओच्या मदतीने पीडितेनं पोलिसात तक्रार दाखल केली. जेव्हा पीडितेनं हा सर्व घटनाक्रम सांगितला तेव्हा हे ऐकून सगळेच हादरुन गेले होते.

त्यानंतर भोपाळ रेल्वे पोलिसांनी आरोपीची माहिती पुणे रेल्वे पोलिसांना दिली आणि त्यानुसार पुणे येथील पोलीस पथकाने या प्रकरणाचा समांतर तपास सुरू केला.

आरोपीने ए 2 झेड हाऊसकीपिंग असे नाव असलेला शर्ट घातला असल्याची माहिती मुलीने पोलिसांना दिली होती. ही माहिती पुणे रेल्वे पोलिसांना सांगितल्यावर ट्रेन अगोदरच पुणे रेल्वे स्थानकावर आली होती.

शहरातील घोरपडी परिसरात तीन संशयित राहत असल्याचे आढळून आल्याने पोलिसांच्या पथकाने त्या ठिकाणी छापा टाकला. आणि आरोपींना ताब्यात घेतलं.