Punelive24.com
Latest News, Videos, Web Stories and Photos from Pune

तिस-या लाटेचा सामना करण्यासाठी पुणे सज्ज

शहरात कोरोनाची संभाव्य तिसरी लाट आल्यास रुग्णांना उपचारासाठी खाटा (बेड) कमी पडू नये, यासाठी जिल्हा प्रशासनाकडून नियोजन करण्यात येत आहे. या अंतर्गत शहर व जिल्ह्यातील रुग्णालयांमध्ये ८१ हजार खाटांचे नियोजन करण्यात आले आहे.

पवारांनी घेतला पूर्वतयारीचा आढावा

पालकमंत्री अजित पवार यांनी पुणे व पिंपरी चिंचवड शहर आणि जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील कोरोना स्थितीचा या बैठकीत आढावा घेतला.

संभाव्य तिसऱ्या लाटेबाबत घ्यावयाची खबरदारी आणि जिल्हा व पालिका प्रशासनाकडून केलेल्या पूर्वतयारीची माहिती त्यांनी घेतली. राव यांनी कोरोनाबाबतच्या आकडेवारीचे या वेळी सादरीकरण केले.

Advertisement

लहान मुलांसाठी सहा हजार खाटा राखीव

जगभरातील काही देशांमध्ये कोरोनाची तिसरी लाट सुरू झाल्याने आतापासून खबरदारी घेण्यासाठी हे नियोजन केल्याचे विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी नुकत्याच झालेल्या कोरोना आढावा बैठकीत सांगितले.

नियोजित एकूण खाटांपैकी लहान मुलांसाठी ६ हजार १६५ खाटा राखीव ठेवण्यात येणार असल्याचेही त्यांनी या वेळी स्पष्ट केले.

संभाव्य तिसऱ्या लाटेची शक्यता

पुणे, पिंपरी चिंचवड आणि जिल्ह्याच्या ग्रामीण भागात मिळून २१९ कोविड केअर सेंटर (सीसीसी), ६१५ समर्पित कोविड आरोग्य केंद्र (डीसीएचसी) आणि ६४ समर्पित कोविड रुग्णालयांत (डीसीएच) या खाटांची सोय केली जाणार आहे.

Advertisement

पुणे शहरात ९ मार्च २०२० रोजी राज्यातील पहिला कोरोना रुग्ण सापडला होता. तेव्हापासून आतापर्यंत कोरोनाच्या दोन लाटा येऊन गेल्या आहेत.

सध्या दुसरी लाट बऱ्यापैकी नियंत्रणात आली आहे; मात्र येत्या ऑॅगस्टनंतर संभाव्य तिसऱ्या लाटेची शक्यता वर्तविली आहे. या पार्श्वभूमीवर हे नियोजन केले आहे.

 

Advertisement

 

Leave a comment