पुणे – कोविडनंतर अनेक रिक्षाचालकांवर (riksha) उपासमारीची वेळ आली आहे. कोरोनानंतर त्यांच्या व्यावसायावर परिणाम झाला. त्यानंतर अनेक पुणेकरांनी बाईक टॅक्सी किंवा कॅबला प्राधान्य दिलं. त्यामुळे रिक्षाचालक (riksha) संतापले आहेत. एका भाकरीमध्ये शंभर तुकडे सरकार करत असल्याचा आरोप रिक्षा चालकांनी केला आहे. त्यामुळे येत्या 28 नोव्हेंबरपासून पुणे शहर आणि पिंपरी-चिंचवड परिसरातील रिक्षाचालक बेमुदत संपावर जाणार आहेत.

पुण्यात (pune) बेकायदा बाईक टॅक्सी (Bike taxi) विरोधात रिक्षा (riksha) चालक आक्रमक झाले आहे.सध्या पुण्यात (Pune) एकूण 12 रिक्षाचालक संघटना आहेत.

या रिक्षा चालकांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. या सगळ्या संघटना बाईक टॅक्सी बंद (Bike taxi) विरोधात एकत्र आल्या आहेत आणि त्यांनी संप पुकारण्याची घोषणा केली आहे.

ओला, उबेर, रॅपिडो कंपनीकडून ॲपद्वारे बेकायदेशीर टू व्हीलरवर होणारी प्रवासी वाहतूक थांबवावी यासाठी पुण्यातील रिक्षा संघटना आक्रमक झालेल्या यातून दिसून येत आहे.

आणि त्यामुळेच असून येत्या 28 नोव्हेंबरपासून पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये बेमुदत बंदचा इशारा पुण्यातील रिक्षा संघटनांनी दिला आहे. रिक्षावाला संघटनेचे अध्यक्ष केशव क्षीरसागर यांनी या बद्दल माहिती दिली आहे.

दरम्यान, आरटीओ कार्यालयासमोर बेमुदत चक्काजाम आंदोलन करणार असल्याचा इशारा देखील विविध संघटनाने पुण्यात दिलेला आहे.

पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरांमध्ये सव्वा लाख रिक्षा चालक व्यावसायिक आहे त्यातले 50 ते 60 हजार रिक्षा चालक 28 तारखेपासून बंद मध्ये सहभागी होणार आहेत. अशी माहिती पत्रकार परिषद घेऊन पुण्यातील संघटनांनी दिलेली आहे.

आपत्कालीन परिस्थितीमध्ये नागरिकांची गैरसोय होणे म्हणून या संघटनातर्फे पन्नास रिक्षा या आपत्कालीन व्यवस्थेसाठी आम्ही तयार ठेवलेल्या आहेत.

त्यासाठी एक नंबर सुद्धा या संघटनाकडून देण्यात आलेला आहे. अतिशय अत्यावश्यक सेवेमध्ये ही रिक्षा नागरिकांना उपलब्ध होणार असल्याची माहिती संघटनांकडून देण्यात आली आहे.

पुण्यातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्था पीएमटी नंतर सगळ्यात मोठी वाहतूक व्यवस्था ही रिक्षा चालकाचीच आहे. त्यामुळे या रिक्षा बंद झाल्या तर शहरावरील प्रवासी वाहतुकीचा ताण वाढेल आणि नागरिकांची गैरसोय होण्याची शक्यता आहे. अशी माहिती या संघटनांनी यावेळी दिली आहे.