पुणे – पुणे-सातारा महामार्गावर (Pune Satara highway) आज सकाळी एक भीषण अपघात (Accident) झाला आहे. हा अपघात सकाळी साडेआठ-नऊ सुमारास हरिश्चंद्री गावाजवळ झाला असून, चालक मात्र यात गंभीर जखमी झाला आहे. मिळालेल्या माहिती नुसार, हरिश्चंद्री गावाजवळ आल्यावर पाऊस आणि तीव्र उतार यामुळं चालकाला रस्त्याचा अंदाज न आल्यान चालकाचे कंटेनरवरचे नियंत्रण सुटले आणि कंटेनर रस्त्यावर पलटी (Accident) झाला.

दरम्यान, या अपघातानंतर (Accident) संपूर्ण पुणे-सातारा महामार्गावर (Pune Satara highway) वाहतूक काही काळ विस्कळीत झाली असून, त्यामुळे वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्याचे दिसून आले.

UP 14 HT 2644 हा कंटेनर पुण्याहून साताऱ्याच्या दिशेने निघाला होता. सातारा महामार्गावर हरिश्चंद्री गावाजवळ सकाळी साडेआठ-नऊ सुमारास हा अपघात झाला.

या अपघातात कंटेनरवर चालक सद्दाम शेख गंभीर जखमी झाले असून, ते मुळचे उत्तर प्रदेशचे रहिवाशी असल्याचे समजत आहे.

दरम्यान, अपघात होताच स्थानिकांनी घटनास्थळी धाव घेऊन मदतकार्य केल आणि जखमी चालक सद्दाम शेख यांना जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलं.

गेल्या 10 दिवसातला हा 3 तिसरा अपघात घडलायं. यापूर्वी देखील पुणे-सातारा महामार्गावर (Pune Satara highway) अनेक अपघात झाल्याचे पाहायला मिळाले आहे.

त्यामुळे येन पावसाळ्यात वाहन चालकांनी देखील खबरदारी घ्यावी. असं आवाहन स्थानिक प्रशासनाकडून करण्यात येत आहे.

दरम्यान, पुणे- सातारा महामार्गाचे काम अपूर्ण असून हरिश्चंद्री ग्रामस्थांनी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण अधिकारी यांच्याकडे वेळोवेळी अपूर्ण कामाविषयी चर्चा केली. मात्र, तरी देखील याकडे दुर्लक्ष करण्यात येत आहे.