पुणे – पुणे- सातारा महामार्गावर (Pune Satara Highway) वाहतुकीची मोठी कोंडी (Traffic Jam) झाली आहे. साताऱ्याकडे येणाऱ्या सातारा बाजूकडून जाणारा खंबाटकी घाट आज सकाळ पासून ठप्प झाला आहे. घाटात दत्त मंदिराजवळ वाहतुकीची मोठी कोंडी झालीय. त्यामुळे महार्गावर वाहनांच्या तीन ते चार किलोमीटरच्या लांबच-लांब रांगा (Pune Satara Highway) लागल्याचं पाहायला मिळत आहे. दिवाळीमुळे शहराबाहेर जाणाऱ्या गाड्या वाढल्यामुळे ही वाहतूक कोंडी झाल्याची माहिती मिळत आहे.

खंबाटकी घाटातील वाहतूक सकाळीच बोगदया मार्गे वळविण्यात आली महामार्ग पोलीस, शिरवळ, खंडाळा, भुईंज, सातारा पोलीस वाहतूक सुरळीत करण्याचा प्रयत्न करत आहेत.

घाटात दत्त मंदिराजवळ वाहतुकीची मोठी कोंडी (Traffic Jam) झालीय. पारगाव-खंडाळापर्यंत वाहनांच्या लांबलचक रांगा लागल्या आहेत. सध्या इतर मार्गानं वाहतूक वळवण्यात येत आहे.

पुणे-सातारा महामार्गावरील (Pune Satara Highway) खंबाटकी घाटात दत्त मंदिराजवळ कंटेनर बंद पडल्यामुळं वाहनांच्या रांगा सात ते आठ किलोमीटर पर्यंत लागल्या आहेत.

सध्या केसुर्डी (ता. खंडाळा) पर्यंत वाहनाच्या रांगा लागलेल्या आहेत. वाहतूक कोंडी टाळून वाहतूक सुरळीत करण्यासाठी घाटाकडे वाहतूक बोगद्या मार्गे वळवण्यात आली.

विशेषतः चाकरमानी दिवाळीचं लक्ष्मीपूजन आपल्या घरी केल्यानंतर आपल्या गावाकडे जातात. अशातच चाकरमान्यांनी आपल्या गावाकडची वाट धरली आहे. सध्या साप्ताहीक सुट्टी आणि दिवाळीनिमित्त गावाकडे जाणाऱ्या वाहनांची गर्दी दिसून येत आहे.

शाळेतील सहामाहीच्या परीक्षा संपल्या आहेत. तसेच आजपासून दिवाळीला सुरुवात झाली आहे. त्याआधी आलेल्या साप्ताहीक सुट्टीची संधी साधून अनेकांनी गावी जाण्याचा निर्णय घेतला आहे.

त्याशिवाय, साप्ताहीक सुट्टी निमित्ताने सातारकर आणि पुणेकर यांनी आपल्या घरचा रस्ता धरल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे पुणे- सातारा महामार्गावर वाहनांची गर्दी दिसून येत आहे.

दरम्यान, रस्त्यावर उतरलेल्या ववाहनांची संख्या पाह्ता महामार्ग सुरळीत होण्यास वेळ लागणार आहे. भुईंजचे सहायक पोलीस निरीक्षक आशिष कांबळे, खंडाळा पोलीस निरीक्षक महेश इंगळे, वाहतूक पोलीस फरांदे, तसेच महामार्ग पोलीस महामार्गावर उपस्थित आहेत.