पुणे – पुणे-सातारा महामार्गावर (Pune Satara highway) काल रात्री 9 वाजताच्या सुमारास एक भीषण अपघात (Accident) झाला आहे. हा अपघात पुणे-सातारा महामार्गावरच्या कापूरहोळ या ठिकाणी झाला असून, या अपघातात (Accident) एकाच जागीच जागीच मृत्यू झाला आहे. पुण्याहून साताऱ्याच्या (Pune Satara highway) दिशेला जात असताना मागून येत असलेल्या ट्रक चालकाचे नियंत्रण सुटल्याने तो ट्रेलरवर धडकला. आठवड्याभरात पुणे-सातारा महामार्गावर हा दुसरा अपघात आहे.

पोलिसांच्या (police) माहिती नुसार, जड वाहतूक करणारा MH14HG7633 हा ट्रेलर शनिवारी रात्री माल घेऊन साताऱ्याच्या दिशेने निघाला होता.

पुणे -सातारा महामार्गावरचा कापूरहोळचा ब्रिज उतरत असताना त्याला अचानक मागून येणाऱ्या DD03P9917 ट्रकची जोरदार धडक बसली, धडक एवढी भीषण होती की यात ट्रक चालकाचा जागीच मृत्यू झाला.

Advertisement

पावसामुळं रस्त्याचा अंदाज न आल्यानं ट्रक चालकाचं ट्रकवरचं नियंत्रण सुटले आणि अपघात घडला आहे. दरम्यान, या अपघाताचा अधिक तपास राजगड पोलीस स्टेशनचे कर्मचारी करत आहेत.

दरम्यान, रात्रीच्या वेळी अपघात झाल्यामुळे काहीकाळ या मार्गावरची वाहतूक विस्कळीत झाली असून, स्थानिक आणि इतर वाहनचालकांची मोठी अडचण झाल्याचे दिसून आले.

यापूर्वी देखील पुणे-सातारा महामार्गावर हरिश्चंद्री गावाजवळ कंटेनरवरचे नियंत्रण सुटल्यामुळे अपघात झाला होता. हा अपघात सकाळी साडेआठ-नऊ सुमारास हरिश्चंद्री गावाजवळ झाला होता.

Advertisement

हरिश्चंद्री गावाजवळ आल्यावर पाऊस आणि तीव्र उतार यामुळं चालकाला रस्त्याचा अंदाज न आल्यान चालकाचे कंटेनरवरचे नियंत्रण सुटले आणि कंटेनर रस्त्यावर पलटी (Accident) झाला.

UP 14 HT 2644 हा कंटेनर पुण्याहून साताऱ्याच्या दिशेने निघाला होता. सातारा महामार्गावर हरिश्चंद्री गावाजवळ सकाळी साडेआठ-नऊ सुमारास हा अपघात झाला होता.

Advertisement