पुणे – इतिहासाच्या अनेक घटनांचा साक्षीदार असणाऱ्या प्रतापगड किल्ल्याच्या पायथ्या लगत असणाऱ्या अफझल खानाच्या कबरीजवळचं अनधिकृत बांधकामावर कारवाई करत अखेर ते बांधकाम प्रशासनाने हटवले आहे. दरम्यान, आता त्यानंतर पुण्यात (Pune) शनिवारवाडा (shaniwarwada) परिसरातील दर्गा (dargah) काढा अशी मागणी करण्यात आली आहे. त्यामुळे नव्या वादाला तोंड फुटले आहे.

पुण्यातील शनिवार (shaniwarwada) वाडा प्रांगणातील अनधिकृत दर्गा हटवा, अशी मागणी हिंदू महासभेच्या (Hindu Mahasabha) वतीने करण्यात आली आहे. तसेच प्रताप गडावर जिवा महाले यांचे स्मारक असावे, अशी भूमिका त्यांनी घेतली आहे.

“इंग्रजांनी जाताना हे थडगं (dargah) इथे तयार केल्याचं काही इतिहासकार म्हणतायत, तर ते इथून काढून टाकावं’, अशी मागणी आनंद दवे यांनी केली आहे. एका प्रसिद्ध वृत्तसंस्थेच्या मुलाखतीत ते बोलत होते.

पुण्यातील (Pune) शनिवार (shaniwarwada) वाड्याच्या मुख्य दरवाजाला उत्तर दरवाजा म्हटलं जातं. 1233 साली हा दर्गा (dargah) बांधण्यात आला होता, असं म्हटलं जातं. पण येथील बॅनर्सनुसार हा 1244 साली बांधण्यात आल्याचं दिसून येतंय.

पण हा दर्गा अनधिकृत आहे आणि तो पाडण्यात यावा, अशी मागणी सध्या होत आहे. आनंद दवे म्हणाले, शनिवार वाड्याच्या प्रांगणात, पुरातत्व खात्याच्या अंतर्गत हे येतं. हे 20-25 वर्षांपूर्वीचं थडगं आहे.

पांडुरंग बलकवडे हे याला 200 वर्षांपूर्वीचा इतिहास असल्याचं सांगतायत. तो विषय वेगळा आहे. पण या दर्ग्याला धार्मिक स्थान नाही. त्यामुळे हे थडगं इथे का असलं पाहिजे, असा प्रश्न हिंदू महासभेने उपस्थित केलाय.

ते पुढे म्हणाले, “1233 साली असा कोणी पीर बाबा पुण्यात आल्याचा कोणताही उल्लेख सापडत नाही. शनिवार वाडा भूमी पूजा पासून ते वास्तू आणि इथल्या प्रत्येक घटनेचा इतिहास उपलब्ध आहे. यात कोठेही या दरग्याचा उल्लेख दिसत नाही.

त्यामुळे हा दर्गा (dargah) नंतर बांधण्यात आला आहे. अनेकवेळी पुरातत्व खात्याला पत्रव्यवहार केला आहे. पुरातत्व खात्याने परवानगी दिली आहे का? असा सवाल उपस्थित केला आहे.

शनिवार वाड्यावर पोलीस बंदोबस्त..!

दरम्यान, त्यांच्या या व्यक्तव्यानंतर शनिवार वाड्याजवळ (shaniwarwada) असलेल्या दर्ग्यावरुन आता वाद पेटण्याची शक्यता आहे.

त्यामुळे या ठिकाणी काही पोलीस तैनात करण्यात आले आहेत. मात्र, आता या घटनेवर पुरातत्व विभाग नेमकं काय उत्तर देणार हे पाहणं महत्वाचं असणार आहे.