पुणे – शिवसेनेत (Shivsena) अभूतपूर्व फूट पडली असून, यामध्ये आता दोन वेगळे गट पाहायला मिळत आहेत. एकनाथ शिंदे (eknath shinde) यांच्या नेतृत्वातील गटाने आपला गटच शिवसेना असल्याचा दावा केला आहे. तर दुसऱ्या बाजूला पक्षात झालेल्या मोठ्या बंडखोरीनंतर पक्षाला पुन्हा उभारी देण्यासाठी उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांचे अनेक प्रयत्न सुरू असल्याचे पाहायला मिळत आहे.

दरम्यान, उद्धव ठाकरे आणि शिंदे गट यांचा हा वाद न्यायालय आणि निवडणूक आयोगापर्यंत पोहोचला. आणि अखेर निवडणूक आयोगाने शिवसेना नाव शिवसेचं धनुष्यबाण हे चिन्ह गोठवलं.

त्यांतर दोन्ही गटाने आपापली चिन्हं आणि नावं दिल्यानंतर सोमवारी संध्याकाळी निवडणूक आयोगाने दोन्ही गटाला नावं दिली. निवडणूक आयोगाने ठाकरे गटाला शिवसेना उद्धव बाळासाहेबत ठाकरे (Shiv Sena Uddhav Balasaheb Tthackeray) हे नाव दिलं आहे.

तर, शिंदे गटाला बाळासाहेबांची शिवसेना हे नाव दिलं. ठाकरे गटाला मशाल (mashal symbol) हे चिन्ह दिल्यानंतर शिंदे गटाला ढाल तलवार हे नवं चिन्ह दिलं आहे.

दरम्यान, भारतीय निवडणूक आयोगाकडून शिवसेना पक्षाला अंधेरी पोट निवडणूकीसाठी मशाल हे चिन्ह आणि शिवसेना बाळासाहेब ठाकरे असे नाव देण्यात आले असून चिन्हाचे अनावरण करण्यासाठी व माननीय पक्ष प्रमुखांना पाठिंबा देण्यासाठी नुकतंच,

पुण्यातील शिवसेना शाखा पौड रोड केळेवाडी कोथरूड या ठिकाणी जल्लोष कार्यक्रम आयोजित करण्यात आला या कार्यक्रमाचे आयोजन शिवसेना शहर संघटक नितीन भाऊ पवार, शुभम कांबळे यांनी केले.

यावेळी या कार्यक्रमास प्रमुख उपस्थितीत शिवसेना शहर प्रमुख गजानन थरखुडे ,शहर समन्वयक नितीन शिंदे ,विभाग प्रमुख भारत सुतार , उपविभाग मंदार धुमाळ, नागेश गायकवाड, प्रविण डोंगरे , लखन तोंडे , सागर तनपुरे , संजय खोंडके, निलेश सोनटक्के, वैभव गायकवाड, तसेच सर्व शिवसैनिक व पद अधिकारी उपस्थित होते.