पुणे : शहरातील पिंपरी चिंचवड (Pimpari Chinchwad) येथे एक धक्कादायक (Shocking) घटना घडली आहे. पतीने (Husband) भररस्त्यात पत्नीला (wife) उचलून आपटले आहे. हे सर्व घटना तिथे असलेल्या सीसीटीव्ही (CCTV) कॅमेरामध्ये कैद झाली आहे.

प्रेम म्हंटल की थोडी भांडण थोडा रुसवा हे तर होतच असते. प्रेमात झालेली भांडण माफ असतात याचेच एक उदाहरण पिंपरी चिंचवड मध्ये दिसून आपले आहे.

प्रेमविवाह (Love marriage) झालेल्या एका जोडप्यामध्ये भांडण झाले होते. त्याच्याच रंगात पतीने थेट रस्त्यावर पत्नीला उचलून आपटले आहे. या घटनेची माहिती पोलिसांना (Police)मिळाल्यानंतर पोलिसांनी या दोघांचा शोध घेतला.

Advertisement

ही घटना आकुर्डी (Akurdi) परिसरात घडली आहे. पोलिसांनी या दोघांना पोलीस ठाण्यात बोलावून घेतले आणि त्यांची विचारपूस केली. पोलिसांनी महिलेला विचारले तुमची पतीविरोधात काही तक्रार आहे का ?

त्यावर पत्नीने उत्तर देत माझी काही तक्रार (Complaint) नसल्याचे सांगितले आहे. पोलिसांनी दोघांना समज दिली आहे. तसेच दोघांना सुखाने संसार करण्याचा सल्लाही दिला आहे.

ही सर्व माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक गणेश जवादवाड (Senior Inspector of Police Ganesh Jawadwad) यांनी दिली आहे.

Advertisement

आकुर्डी येथे कामावर निघालेल्या तरुणीला तिचा पती मानेला धरून भरस्त्यात खाली आपटतो. तरीही पत्नी काहीही न बोलता कामावर निघून जाते.

हा सर्व प्रकार सीसीटीव्ही मध्ये चित्रित झाल्यामुळे पोलिसांना याची माहिती मिळाली. पोलिसांनी दोघांना बोलावून चौकशी चौकशी असता पत्नीने तक्रार देण्यास नकार दिला आहे.

Advertisement