पुणे – पुणे शहर (Pune) आणि परिसरात महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या भागातून नागरिक कामानिमित्त आणि शिक्षणासाठी येत असतात. नोकरदारवर्ग देखील पुण्यात मोठ्या संख्येने आहे. आता दिवाळीचा सण अवघ्या दोन दिवसांवर येऊन ठेपला आहे. त्यानिमित्ताने आता पुण्यातून चाकरमान्यांनी आपल्या गावाचा रस्ता धरला आहे. त्यासाठी पुण्यातील वाकडेवाडी बस स्थानक, स्वारगेट (swargate) बस्थानकांवर गावी (Pune ST Bus) जाणाऱ्यांची मोठी गर्दी होत आहे. अश्यातच राज्यात परतीच्या पावसानं (Heavy Rain) धुमाकूळ घातला असून त्यात पुण्याला (Pune) तर चांगलचं झोडपून काढलं आहे.

यामुळे अनेक ठिकाणी रस्त्यांना नद्यांच स्वरुप आल्याचं पाहायला मिळालं. अशातच पुणे शिवाजीनगर (shivajinagar) बसस्थानकावर प्रवाशांचा मोठा गोंधळ निर्माण झाल्याचं पाहायला मिळालं.

एसटी बसचे वेळापत्रक कोलमडल्याने प्रवाशांचे मोठे हाल झाले. त्यात एसटी प्रशासन देखील उद्धट उत्तरं देत असल्याचा आरोप करत प्रवाशांनी संताप व्यक्त केला. दिवाळीनिमित्त एसटी प्रशासनाने केलेले नियोजन मात्र पुण्यात पूर्णपणे कोलमडल्याचेच चित्र दिसले आहे.

दिवाळी सण अवघ्या दोन दिवसांवर असल्याने चाकरमान्यांना त्यांच्या निश्चितस्थळी पोहचण्यासाठी एसटी बस उपलब्ध नसल्याने प्रवाशांना त्रास सहन करावा लागला.

मंगळवारच्या रात्री पुणे शिवाजीनगर बसस्थानकावर मोठा गोंधळ पाहायला मिळाला. दरम्यान, पुण्यात काल अक्षरशः पावसाने हैदोस घातल्याचं पाहायला मिळालं.

एसटी बसचे नियोजन तसेच वेळापत्रक कोलमडल्याने गाड्या उशीराने धावत होत्या. त्यामुळे प्रवाशांचा एकच गोंधळ काल शिवाजीनगर बस स्थानकावर दिसून आला. वेळेवर बस उपलब्ध नसल्याने प्रवाशांचे प्रचंड हाल होताना दिसले.

बस का लेट झाली? काही प्रवासी विचारायला गेले असता स्वारगेट एसटी स्टँड येथील कर्मचाऱ्यांनी त्यांना हाकलून लावलं. आम्हाला माहित नाही असे उत्तर त्यांच्याकडून दिले जात आहेत. कुठूनही समाधनकारक उत्तर न मिळाल्यामुळे आता नेमकं करायचं काय? असा प्रश्न प्रवाशांना पडला आहे.