पुणे : राज्य उत्पादन शुल्क विभागाने (State Excise Department) पुण्यात नववर्षाच्या (New Year) पार्श्ववभूमीवर ५ पथके नियुक्त केली आहेत. ३१ डिसेंबरला दारूची (Alcohol) विनापरवाना (Unlicensed) खरेदी विक्री होऊ नये म्हणून हे पाऊल उचलण्यात आले आहे.

आंबेगाव (Ambegoan) व हवेली (Haveli) तालुक्यात धडाकेबाज कारवाई (Action) करून बनावट देशी, विदेशी दारूचा साठा जप्त केला आहे.

तसेच बनावट मद्य तयार करण्यासाठी आवश्यक असलेले स्पिरीट, रिकाम्या बाटल्या, बाटल्या सील करण्याचे यंत्र, टेम्पो असा ९ लाख १४ हजार ४३२ रुपये किंमतीचा मुद्देमाल राज्य उत्पादन शुल्क विभागाने जप्त (Confiscated) केला आहे.

Advertisement

राज्य उत्पादन शुल्क विभागाचे पोलीस निरीक्षक ए. बी.पवार (State Excise Department Police Inspector A. B. Pawar) यांनी अशी माहिती दिली आहे की, दोन तरुणांना अटक केली असून आरोपींना जुन्नर न्यायालयाने (Junnar Court) ३ जानेवारी पर्यंत पोलीस कोठडी दिली आहे.

सागर तुकाराम कतोरे, मयूर बाळासाहेब कतोरे (दोघेही राहणार चिंबळी, ता.खेड) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. पोलिसांना माहिती मिळाली होती की, कळंब (Kalamb) येथून बनावट दारू घेऊन वाहन जाणार आहे.

त्यानुसार पोलिसांनी सापळा रचत टेम्पोची तपासणी केली असता हा सर्व प्रकार उघडकीस आला आहे. आरोपीनीची चौकशी केली असता काळेवाडी (Kalewadi) येथे गोडाऊन (Godaun) मध्ये बनावट दारू तयार केली जाते असे सांगण्यात आले.

Advertisement

त्यानंतर पोलिसांनी (Police) काळेवाडी येथील गोडाऊन मध्ये छापा टाकत तिथले दारू बनावटीचे सर्व साहित्य आणि दारू जप्त केली आहे.