
पुणे : जिल्ह्यातील वाढती कोरोना रुग्णसंख्या (Corona Patients) पाहता जिल्हा प्रशासनाने (District Administration) कठोर पाऊले उचलायला सुरुवात केली आहे. विनामास्क (Without Mask) फिरणाऱ्यांवर आजपासून कडक कारवाई होणार आहे.
मास्क नसेल तर पुणे जिल्ह्यात (Pune District) प्रवेश मिळणार नाही. त्यामुळे सतत मास्कचा आता वापर करणे अनिवार्य असणार आहे. मास्क नसेल तर दंडात्मक कारवाई (Action) करण्यात येणार आहे.
राज्यात कोरोनाचा नवा व्हेरिएंट ओमिक्रॉन (Omicron) या विषाणूचे देखील रुग्ण वाढत आहेत. त्यामुळे राज्यात कडक निर्णयांची अंमलबजावणी करण्यात येत आहे.
पुणे जिल्ह्यात प्रवेश करण्यासाठी निर्बंध लागू करण्यात आले आहेत. जर पुणे जिल्ह्यात प्रवेश करायचा असेल तर तुम्ही लस घेणे बंधनकारक असणार आहे.
लस (Vaccine) घेतली असेल तरच प्रवेश मिळणार आहे. लास घेतली नसेल तर प्रवेश मिळणार नाही. जिल्ह्यात आणि शहरात विनामास्क फिरणाऱ्यांकडून दंड आकारण्यात येणार आहे.
मास्क नसेल तर ५०० रुपयांचा दंड वसूल करण्यात येणार आहे. उपमुख्यमत्री अजित पवार यांनी पत्रकार परिषद (Press conference) घेतली होती.
त्यामध्ये नव्या नियमांबाबत घोषणा केली आहे. अजित पवार बोलताना म्हणाले, पुण्यात उद्यापासून मास्क नसेल तर ५०० रुपये दंड आकारला जाणार आहे.
रस्त्यावर थुंकल्यावर १ हजार रुपये दंड आकारला जाईल. वेगवेगळ्या डिझाईनचे कापडी किंवा २ प्लायचे सर्जिकल मास्क वापरू नका. N95 किंवा ३ प्लाय असलेल्या मास्कचाच वापर करा, असे आवाहन अजित पवार यांनी केले आहे.
त्याचबरोबर उद्यापासून पुणे जिल्ह्यात सर्वत्र मॉल, खासगी तसेच सरकारी कार्यालयात कोरोना लसीचे दोन्ही डोस झाले नसतील तर प्रवेश मिळणार नाही.
नियमांची अंमलबजावणी करण्यासाठी पोलीस खात्याला सक्त सूचना दिल्याचे अजित पवार (Ajit Pawar) यांनी सांगितले आहे.