पुणे : जीवनात नैराश्य आलेल्या २३ वर्षीय तरुणाने (Young) कात्रज (Katraj) येथील भिलारेवाडी तलावात (Bhilarewadi Lake) उडी मारून आत्महत्या (Sucide) केली आहे. आत्महत्या करण्यापूर्वी तरुणाने कुटुंबियांसाठी एक मेसेज (Message) पाठवला होता.

शंकर बसवराज कलशेट्टी (वय २३) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. अग्निशमन दलाच्या जवानांनी (Firefighters) भिलारेवाडी येथील तलावातून या तरुणाचा मृतदेह (Dead Body) बाहेर काढला आहे.

माझ्या जीवनात काय समस्या आहेत आणि त्या मी सोडवू शकत नाही आणि त्या समस्या संपतही नाही. त्या फक्त वाढतच आहेत या सर्व समस्या कोणासोबत शेअर करणे सुद्धा अपमानास्पद वाटते.

Advertisement

या सर्व समस्या घेऊन मी जगू शकत नाही. काही दिवसांनी या समस्या अजून वाढतच जाणार आहेत. मी सहन करु शकत नाही अगोदरच खूप त्रास सहन केला आहे.

आता अजिबात सहन होत नाही म्हणून मी माझ्या स्वतःच्या इच्छेने माझे जीवन संपवत आहे. माझ्या आत्महत्येला कोणालाही जबाबदार धरू नये. पोलिसांनी कोणाची विचारपूस करण्याची गरज नाही.

आई,बाबा,आज्जी, आजोबा आणि भक्ती मला माफ करा. मी जगण्याचा खूप प्रयत्न केला. पण काय करू, प्रॉब्लेम घेऊन मी जगू शकत नाही. मी शेवटचा निर्णय घेतला आहे.

Advertisement

असा मेसेज तरुणाने कुटुंबियांना आत्महत्येपूर्वी केला आहे. हा मेसेज कुटुंबियांना मिळताच त्यांनी भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात (Bharati University Police Station) धाव घेतली त्यावेळी घडलेला सर्व प्रकार सांगितला.

पोलिसांनी लगेच तपास सुरु केला. पोलिसांना भिलारेवाडी तलावाजवळ तरुणाची चप्पल आढळून आली. त्यावरून पोलिसांनी अग्निशमन दलाच्या जवानांना घटनास्थळी बोलावून शोधमोहीम केली असता तरुणाचा मृतदेह सापडला आहे.

आत्महत्या करण्यापूर्वी तरुणाने हाताची नस कापलेली पोलिसांना आढळून आली होती. मृतदेह शव विच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवण्यात आला आहे.

Advertisement