पुणे : शहरातील सिहंगड रस्त्यावरील (Sihangad Road) किरकटवाडी (Kirkatwadi) येथे मे लेकीने राहत्या घरात गळफास घेत आत्महत्या (Sucide) केल्याची धक्कादायक (Shocking) घटना घडली आहे. त्यामुळे परिसरात खळबळ उडाली आहे.

आत्महत्या करण्यापूर्वी एक चिट्ठी (Sucide Note) लिहली आहे. राहत्या घरात मध्यरात्रीच्या सुमारास गळफास लावत मायलेकींनी आत्महत्या केली आहे. चिट्ठीमध्ये कोणालाही जबाबदार धरू नये असे लिहले आहे.

रेवा दत्तात्रय खपाले (वय २४, मुलगी), संगीता दत्तात्रय खपाले (वय ४८, आई) असे आत्महत्या केलेल्या मे लेकींची नावे आहेत. आई सतत आजारी असल्यामुळे आत्महत्या केल्याचे उघडकीस आले आहे.

Advertisement

संगीता खपाले यांना मागील काही वर्षांपासून दुर्धर आजाराने ग्रासले होते. तसेच त्यांची घरची आर्थिक परिस्थितीही बेताची आहे. किरकटवाडी येथे एक मुलगा व दोघी माय-लेकी भाड्याच्या घरात राहत होते.

मोठी मुलगी विवाहित असून ती खडकवासला येथे राहण्यास आहे. आजारपणामुळे संगीता यांना हालचाल करणे कठीण झाले होते.

मुलगी रेवा ही घरी राहून आईची काळजी घेत होती. दत्तात्रय खपाले हे मुळ गावी सोलापूर (Solapur) येथे शेती करण्यासाठी राहत होते.

Advertisement

मध्यरात्री १ वाजण्याच्या सुमारास मायलेकीने घरात गळफास घेत आत्महत्या केली आहे. मुलगा पाणी पिण्यासाठी उठल्यानंतर हा सर्व प्रकार उघडकीस आला आहे.

यानंतर मोठ्या बहिणीस माहिती देण्यात आली. मोठ्या बहिणीने घडलेला सर्व प्रकार हवेली पोलीस ठाण्यात (Haveli Police Station) सांगितला.

घटनेची माहिती मिळताच पोलिसांची टीम घटनास्थळी दाखल झाली. घटनेचा अधिक तपास महिला पोलीस उपनिरीक्षक ऋतुजा मोहिते (Women Sub-Inspector of Police Rutuja Mohite) करत आहेत.

Advertisement